अपुऱ्या झोपेचे परिणाम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 April 2019

 आपली मानसिक क्षमता व स्मरणशक्तीसाठी अपुरी झोप जास्त घातक असते. यामुळे स्मृती कमी होण्यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो.

हेल्थ टिप्स :-
                निरोगी राहण्यासाठी व्यायामाबरोबच झोपही महत्त्वाची आहे. आपल्या शरीरासाठी किमान आठ तासांची झोप आवश्‍यक असते. आपल्याला आठ तास झोप घेता येत नसल्यास विविध अडचणी उद्‌भवू शकतात.
           आपण झोपल्यावर शरीरात काही सकारात्मक बदल होत असतात. ज्यामध्ये आपला विकास, सुधारणा, पेशींचे आराम, मानसिक विकास याचा समावेश असतो. अपुऱ्या झोपेमुळे हे फायदे मिळत नाहीत. आपली मानसिक क्षमता व स्मरणशक्तीसाठी अपुरी झोप जास्त घातक असते. यामुळे स्मृती कमी होण्यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो.

        अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला योग्य तेवढी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे ताण येऊन मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्‍यता असते. डोके जड होणे, चिडचिड होणे, शारीरिक वेदना होणे, तसेच क्रॅम्प्सची येऊ शकतात. याचा महत्त्वाचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो. अपुऱ्या झोपेमुळे पचन शक्ती कमजोर होऊन पोटाचे विकार होतात. त्यामुळे दिवसभर आळस, निरुत्साह, नैराश्‍य, लक्ष केंद्रित न होणे, केस गळणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, चेहऱ्यावर आणि मानसिक थकवा जाणवणे, वजन न वाढणे या समस्यांचा सामना करावा लागतो.

          मधुमेह असणाऱ्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास अडचणी येतात. अपुऱ्या झोपेप्रमाणे अति झोपेमुळेही काही समस्या आहेत. त्यामुळे नियमित आवश्‍यक असलेलीच झोप घेणे महत्त्वाचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News