'गणितीय सुत्रा'नुसार महाविद्यालयाचा निकाल लागणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 July 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून सर्व अकृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रक नियोजन करणे, तसेच परीक्षांकरीता एक सामाई योजना तयार करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. समितीने सुचविलेल्या सर्व शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत. 

पुणे - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यानं राज्य सरकारने महाविद्यायालयीन सर्वच परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नसल्याने निकाल कसे तयार करावे असा पेचप्रसंग प्राध्यापकांसमोर होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे निकाल 'गणितीय सुत्रा'नुसार तयार करण्याचे निश्चित केले आहे. 'गणितीय सुत्रा'मुळे परीक्षांचा निकाल काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच अंतिम वर्ष आणि अंतिम सत्रातील परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास वेळ लागेल असं विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

प्रथम वर्ष ते अंतीमपूर्व परीक्षांच्या निकालाचे गणितीय सूत्र निश्‍चित करण्यात आल्याचे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यातील सर्व संलग्न महाविद्यालयाच्या प्राचार्य, संचालकांना यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून सर्व अकृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रक नियोजन करणे, तसेच परीक्षांकरीता एक सामाई योजना तयार करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. समितीने सुचविलेल्या सर्व शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत. 

ठरल्याप्रमाणे अंतिम वर्षातील विद्यार्थी सोडल्यास पदविका, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना देण्यात येणारी ग्रेड ही 50 टक्के मुल्यमापनावर आधारित आहे. इतर ५० टक्क्यांबाबत विचार करून ठरवला जाणार आहे. याकरिता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने 'गणितीय सूत्रा'स विद्यापरीषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, व्यवस्थापन परीषद या विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी मान्यता दिलेली आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News