ठरल ! उद्या बारावीचा निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020

उद्या गुरुवारी (ता.१६) दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहायला मिळणार आहे.

मुंबई : कोरोनामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या बारावी एसएससी निकालाची तारीख अखेर ठरली. उद्या गुरुवारी (ता.१६) दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहायला मिळणार आहे. निकालाची तारीख जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला. निकाल पाहण्याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. केव्हा एकदाचा निकाल पाहतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 'बारावीचे सर्व विद्यार्थी उद्या १ वाजता निकाल पाहण्यासाठी गर्दी करतील. त्यामुळे निकालाचे सर्व्हर डाऊन होईल. त्यासाठी तीन संतेकस्थळ देण्यात आली आहेत' अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी दिली.  

दिलेल्या संकेतस्थळार विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक टाईप केल्यानंतर निकाल दिसणार आहे. त्यानंतर निकालाची झेरॉक्स प्रत विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकाच ठिकाणी गर्दी करुन नये असे आवाहन एसएससीकडून करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत, असे वाटते त्यांना रि चेकींगसाठी १७ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. शेवटची तारीख २७ जुलै असणार आहे. तर उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी मिळवण्यासाठी १७ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान विनंती अर्ज सदर करता येणार आहे. या तारखेनंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.  

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

www.maharesult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News