अंतिम वर्षाच्या परीक्षा संबंधित सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करतो पण...

रसिका जाधव (सकाळ वृत्तसेवा - यिनबझ)
Saturday, 29 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून अनेक वाद निर्माण झाले होते.
  • त्यामुळे विद्यार्थी देखील द्विध्दा मनस्थिती होते की, परीक्षा होणार आहे की नाही, झाली तर ती कधी होणार आणि कशी होणार असे अनेक प्रश्न विद्यार्थांच्या मनात होते.

मुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून अनेक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे विद्यार्थी देखील द्विध्दा मनस्थिती होते की, परीक्षा होणार आहे की नाही, झाली तर ती कधी होणार आणि कशी होणार असे अनेक प्रश्न विद्यार्थांच्या मनात होते. परंतु कालच सर्वोच्च न्यायालायाने अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. सर्वेच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर पर्यंत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो परंतु खरंच सर्व या निर्णयावर सहमत आहेत का? अंतिम वर्षाच्या परीक्षा संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर तुम्ही सहमत आहात का? याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

होय जर परीक्षाच दिली नाही तर पदवी कशी देता येईल? कोरोनाच्या पार्श्वभूमी वर सगळीकडे बंद असताना परीक्षा घेणे हे पण चूकीचेच आहे. धोका सर्वात जास्त तर गर्दितच असतो. पण त्यामुळे जे पदवीसाठी पात्र नाही त्यांना ही परीक्षा न घेता पदवी देण म्हणजे बेरोजगारी वाढवणे.

परीक्षा घ्यावी पण त्यासोबतच विद्यार्थांच नुकसान होणार नाही याची पण काळजी घ्यावी. थोड उशिरा परीक्षा घ्यावी. नोकरभरतीसाठी १ वर्ष वाढवून द्यावे. ज्याने उशिरा परीक्षा घेऊन ही विद्यार्थांच नुकसान होणार नाही.

- विपुल जानराव

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशाच याही विषयाबाबत दोन बाजू आहेत, पहिली गोष्ट म्हणजे अंतिम वर्ष हे भविष्य ठरवत नसतं पण कॉर्पोरेट जगामध्ये  पहिलं पाऊल ठेवण्यासाठी सुरुवातीला पदवी गरजेची असते त्यामुळे पदवी परीक्षा आवश्यक आहेतच पण आताची परिस्थिती आपण बघतो आहोत की, केंद्र सरकार वेगळ्या निर्णयावर आहे तर राज्य सरकार सुद्धा करावी की करू नये अशी द्विध्दा मनस्थिती झालेली असताना आपण विद्यार्थ्यांची मानसिकता कुठेतरी समजून घेतली पाहिजे कारण कित्येक विद्यार्थी परीक्षा नाहीत म्हणून निश्चिंत झाले होते, काही विद्यार्थ्यांना कोरोनाची धास्ती आहे. त्याच्यामुळे कशी परीक्षा द्यायची? हा प्रश्न त्यांच्या मनात आहे, याची कुठेतरी त्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे आणि अप्रत्यक्षरित्या अभ्यासावरही  त्याचा परिणाम होत आहे त्यामुळे परीक्षा घेण्याची घाई होऊ नये असं मला यामध्ये नमूद करायचे.

परीक्षा न घेणं म्हणजे कुठेतरी विद्यार्थी आळशी होतील त्यामुळे परीक्षेची घाई न करता विशेष खबरदारी घेऊन, कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन घ्याव्यात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याचाही विचार केला पाहिजे आणि परीक्षार्थी न घडवता विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न व्हावा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच परीक्षा घ्याव्यात पण त्याची घाई होऊ नये असं मला वाटतं

- गार्गी गोरेगावकर

हो, अंतिम वर्षाच्या परीक्षा संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मी सहमत आहे. पण हा या परीक्षा थोड्या उशिरा व्हाव्यात असं माझं मत आहे.

-श्रद्धा ठोंबरे

मी ह्या मतांशी सहमत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे. कारण परीक्षा झाल्या नसत्या आणि त्यांना प्रमाणपत्र दिले असते. सरकारी नोकरीत काही अडचण जर झाली असती तर सरकारने काही तोडगा काढला असता. मात्र सरकारी नोकऱ्या किती मिळणार हा ही प्रश्न आहे आणि या प्रमाणपत्रावर जर प्रायव्हेट क्षेत्रात गेले असते आणि त्यांनी जर पासचे प्रमाणपत्र मागीतले तर मग विद्यार्थ्यांनी काय करायचे होते. परत परीक्षाही देता येत नाही आणि नोकरीही मिळणार नाही.

परिक्षा घ्यायला पाहिजे, मान्य पण ज्या देशात दररोज कोरोणाचे ७०००० हजार रुग्ण वाढत आहेत अशा परिस्थितीत परीक्षा कशा घ्याव्यात आणि परीक्षा केंद्रावर विद्यार्थी कसे पोहोचतील, तसेच बाहेर गावातील विद्यार्थी त्यांच्या  रहाण्याची आणि जेवणाची सोय कशी होईल इत्यादी प्रश्न उभे आहेत. त्या बद्दल काही गाईड कोणीच बोलत नाहीत हे विशेष म्हणतात येईल.

परीक्षा ही झालीच पाहिजे नाहीतर उद्या ते जॉबसाठी गेले तर डिग्री मागितली तर सांगतील आम्ही कोरोनामध्ये सरकारने पास केले ह्यापुढे सगळेच म्हणतील आम्हालासुद्धा पास करा.

-महेश सोरटे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News