क्रिकेट नियमांच्या बायबलमध्ये हिंदीचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 July 2020
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी क्रिकेट नियम तयार करणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्‍लबला (एमसीसी) क्रिकेटचे बायबल समजले जाते.
  • या बायबलमध्ये आता हिंदी भाषा सन्मानाने झळकणार आहे.

इंदूर :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी क्रिकेट नियम तयार करणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्‍लबला (एमसीसी) क्रिकेटचे बायबल समजले जाते. या बायबलमध्ये आता हिंदी भाषा सन्मानाने झळकणार आहे.

भारतीय क्रिकेटमधील माजी पंच राजीव रिसोडकर यांनी क्रिकेटच्या सर्व नियमांचे हिंदीत भाषांतर केले आहे आणि हे नियम मेरिलबोन क्रिकेट क्‍लबच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत.

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेबरोबर सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. एमसीसीच्या २०१९ मधील दुसऱ्या आवृत्तीत हिंदीत भाषांतरित केलेल्या नियमांना स्वतंत्र स्थान आहे. हे भाषांतर रिसोडकर यांनी केले आहे, असे मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सचिव संजीव राव यांनी सांगितले.

५८ वर्षीय रिसोडकर हे बीसीसीआयचे पंच होते. १९९७-२०१६ या काळात त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पंचगिरी केलेली आहे. बीसीसीआयच्या लेव्हल ३ पंच प्रशिक्षणात ते दोन दशके काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पंच तयार झाले आहेत.

पारंपरिकरीत्या क्रिकेटचे सर्व नियम इंग्रजीत असतात. बीसीसीआयने केलेल्या सूचनेनुसार मी या सर्व नियमांचे हिंदीत भाषांतर केले. त्यामुळे हे नियम जास्तीत जास्त लोकांना सहजपणे समजणे सोपे जाईल, असे रिसोडर यांनी सांगितले. एका महिन्यात आपण हे भाषांतर पूर्ण केले असल्याचे ते म्हणाले.

काय आहे एमसीसी

लॉर्डस येथील मेरिलबोर्न क्रिकेट क्‍लब (एमसीसी) १७८७ मध्ये स्थापन झालेला आहे. आयसीसीचे सर्व नियम तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News