विद्यार्थ्यांना दिलासा, आयटीआय प्रवेश प्रक्रियेला सुरवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

जालना - येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी विविध व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. ३० जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वर्षापासून विद्यार्थ्यांना नॅशनल स्किम क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्‍युएफ) या नव्या श्रेयांक पद्धतीनुसार शिक्षण दिले जाणार आहे.

जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक ते दोन वर्षे कालावधीचे विविध अभ्यासक्रम नवी दिल्ली प्रशिक्षण महासंचालनालय व उद्योग धंद्यातील तज्ज्ञ यांच्यातर्फे प्रशिक्षणार्थी क्षमता आणि गरज ओळखून आयटीआय अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

शिल्पकारागीर योजनेंतर्गत प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असून यामध्ये एकूण १५ ट्रेडमध्ये ३९२ जागा आहेत. त्यात ७० टक्के जागा जालना तालुक्‍यातील उमेदवारांसाठी, तर ३० टक्के जागा अन्य तालुक्‍यातील उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आयटीआयचा मूळ गाभा असलेल्या कौशल्याधारित शिक्षणाचा दर्जा आणखी वाढविण्यासाठी या वर्षीपासून प्रशिक्षणार्थ्यांना एनएसक्‍यूएफच्या दर्जाप्रमाणे शिक्षण दिले जाणार आहे.

या नव्या श्रेयांक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची विविध शैक्षणिक स्तर आणि पात्रता ओळखून त्यांच्यात शिक्षण विकसित करणे, मूल्यांकन करणे व सुधारणा करण्यास मदत होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर एनएसक्‍यूएफ लेव्हलचा उल्लेख असणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News