राजनैतिक पिढी घडविण्याचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 10 August 2019
  • समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी
  • 'थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य सिद्धांताच्या 28 वा सूत्रपात
  • मुंबई मध्ये 12 ऑगस्ट ला होणार नाटक

मुंबई : 'संविधान वाचवूया देशाची विविधता वाचवूया' या मिशनला साकार करण्याच्या हेतूने 'थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य सिद्धांताच्या 28 वा सूत्रपात दिवसानिमित्त  “विचार, विविधता, विज्ञान, विवेक आणि संविधान सम्मत” राजनैतिक पिढी घडविण्याचा संकल्प करण्यात  आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी   शिवाजी नाट्य मंदिर,दादर मुंबईमध्ये हे  नाटक राजगतिचे सादरीकरण  होणार आहे. 
  
या नाटकाच्या माध्यमातून कुठल्याच सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदाना शिवाय आपली प्रासंगिकता आणि आपल्या मूल्यांच्या बळावर  'थिएटर ऑफ़ रेलेवंस’नाट्यतत्व देश विदेशात आपले अस्तित्व दाखवत आहे आणि बघणाऱ्यांना आपल्या असण्याचे औचित्य सांगत आहेत. ज्यावेळी सत्ता स्वतः संविधानाला खंडित करत असते अशावेळी देशाचे मालक असलेल्या जनतेने संविधानाचे रक्षण करण्याची गरज आहे.  

याचे लेखक व दिग्दर्शक मंजुल भारद्वाज आहेत  अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, स्वाति वाघ, सचिन गाडेकर, बेट्सी एंड्रूज,ईश्वरी भालेराव, प्रियांका कांबळे हे कलाकार आहेत. ‘थिएटर ऑफ रेलेवंस’ नाट्य सिद्धांताचे पूर्णत्वाचे हे 27 वे वर्ष असून शिवाजी नाट्य मंदिरमध्ये 12 ऑगस्टला सकाळी 11 वाजता होणार आहे. 

मागील 27 वर्षांपासून सांप्रदायिक मुद्द्यावर ‘दूर से किसी ने आवाज दी’, बाल मजुरी वर ‘मेरा बचपन’, घरगुती हिंसेवर ‘द्वंद्व’, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत अर्ध्या लोकसंख्येचा आवाज ‘मैं औरत हूँ’ , ‘लिंगनिदान’ या विषयावर नाटक ‘लाडली’, जैविक आणि भौगोलिक विविधतेवर “बी-७”, मानवता आणि निसर्गाच्या प्राकृतिक संसाधनांच्या खासगीकरणाच्या विरोधात “ड्राप बाय ड्राप : वॉटर”, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी “गर्भ”, शेतकऱ्यांची  आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावर ‘किसानों का संघर्ष’, कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक “अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ  युनिवर्स”, शोषण आणि दमनकारी पितृसत्ततेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार “न्याय के भंवर में भंवरी”, समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी ‘राजगति’ नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी लढत आहे ! सतत कुठल्याच सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदाना शिवाय आपली प्रासंगिकता आणि आपल्या मूल्यांच्या बळावर हे नाट्यतत्व देश विदेशात आपले अस्तित्व दाखवत आहे आणि बघणाऱ्यांना आपल्या असण्याचे औचित्य सांगत आहेत. सरकारच्या 300 ते 1000 करोडच्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेटच्या विरुद्ध प्रेक्षक सहभागितेने हे  रंग आंदोलन मुंबई पासून मणिपूर पर्यंत उभे आहे.. !

 

 

याच क्रमाप्रमाणे सुप्रसिद्ध रंग चिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक “राजगति” समता, न्याय, मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठी ‘राजनैतिक परीदृश्याला' बदलण्याची चेतना जागवते.नाटक "राजगति" सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीती' ची गति आहे. राजनीति ला पवित्र नीति मानत आहे. राजनीति घाणेरडी आहे, या भ्रमाला तोडून राजनीति मध्ये जन सहभागितेची मागणी करते. ‘माझे राजनीतीशी घेणं देणं काय' सामान्य जनतेच्या या अवधारणेला दिशा देते. सामान्य जनता लोकशाहीचे पहारेकरी आहेत आणि पहारेकरी आहेत तर सामान्य जनतेचा सरळ सरळ राजनीतीशी संबंध आहे. 

अशा वेळी "थिएटर ऑफ रेलेवन्स" चे कलाकार समाजाच्या ‘फ्रोजन स्टेट’ ला तोडण्यासाठी विवेकाच्या मातीत विचारांचे अंकुर लावण्यासाठी प्रतिबद्ध आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News