महाराष्ट्राच्या शिलेदाराने फडकवला अफ्रिकेच्या किलीमांजरोवर 71 फुटी तिरंगा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 January 2020
  • आफ्रिका खंडातील सर्वोच माऊन्ट किलीमाजंरो शिखर 5895 मीटर उंच

टाझांनिया : 71 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊन्ट किलीमाजंरो महाराष्ट्राचा शिलेदार सागर विजय नलवडे यांनी सर केले आहे. या प्रजासत्ताकदिनी तब्बल 71 फुटी भारताचा तिरंगा माऊन्ट किलीमाजंरोवर फडकावला. गिर्यारोहक सागर नलवडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालूक्यातील करनूर गावचा रहीवाशी आहे. 

प्रजासत्ताक दिनी लाल किल्यावर तिरंगा फडकवला जात असताना सागरने आफ्रिका खडांतील सर्वोच्च शिखरावर 71 फुट तिरंगा फडकावत नवा विक्रम केला. यामुळे सर्व स्तरातून त्याचे कौतूक होता आहे. समुद्र सपाटीपासून 5895 मीटर उंच माऊन्ट किलीमाजंरो शिखर आहे. शिखरावर तापमान ऊने 15 ते 20 सेल्सीअस होते, तसेच बर्फवृष्टी चालू होती अशा कठीण परिस्थितीत सागरने सहकारी मित्रांसह 'शिलेदार अ‍ॅडव्हेंचर इंडिया' कडून हा नवा विक्रम केला.

तिरंगा फडकावल्यानंतर सर्व टिमने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. स्वराज्याची राजधानी रायगडवरची माती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शिखरावर नेऊन अभिवादन केले. 

15 ऑगस्ट 2019 रोजी युरोप खंडातील सर्वात उंच शिखर (5642 मीटर इतकी उंची) माऊन्ट एलब्रुसच्या बेस कॅम्पवर 73 फुट भारतीय तिरंगा फडकवला होता. त्याची नोंद विविध रेकॉर्ड बुकमध्येदेखील करण्यात आली आहे. 

आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर माऊन्ट किलीमाजंरो या मोहिमेत शिलेदार सागर विजय नलवडे यांच्यासह त्याचे सहकारी अर्नाळा वसई येथील रोहित पाटील, ईदांपूर येथील योगेश करे आणि ऊत्तर प्रदेश पोलीस जवान आशिष दीक्षित हे सहभागी होते. 

या मोहिमेला 'मोहिम सह्याद्रीच्या लेकराची' असे नाव देण्यात आले होतो. मोहिमेसाठी 360 एक्सप्लोरचे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे सहकार्य लाभले आहे. मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचेदेखील बहुमोल मार्गदर्शन आणि मदत या मोहिमेसाठी मिळाली आहे. मोहिमेला कागलचे राजे समरजितसींह राजे, आमदार हसन मुश्रीफ तसेच महाराष्ट्रातील सर्व सह्याद्री मित्रांनी बहुमोल असे आर्थिक सहकार्य केले आहे.

 

जगातल्या सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करायची आहेत. त्यापैकी युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माऊन्ट किलीमाजंरो आणि आफ्रिका खंडातील माऊन्ट किलीमाजंरो ही दोन शिखरे सर केली आहेत. पुढील काळात पाच खंडातील पाच शिखरे मला सर करायची आहे. पण या हिमशिखराच्या मोहिमा खुप खर्चिक व अवघड आहेत, त्या मोहिमा करणे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला खुप आव्हानात्मक आहेत. मी जिद्दीने या मोहिमांची तयारी करत आहे. मोहिमांसाठी लागणारे सर्व सहकार्य मिळत आहे.
सागर विजय नलवडे, गिर्यारोहक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News