मातोश्रीच्या 170 सुरक्षा रक्षकांचा अहवाल निगेटीव्ह पोलिस यंत्रणेला दिलासा; नियामानुसार सर्व जण होम क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 April 2020

त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तेथे तैनात 170 पोलिस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्या सर्वांचे अहवाल आता निगेटीव्ह आले आहेत. मात्र नियमानुसार त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात एका चहा वाल्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परिसरात तैनात 170 पोलिस सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यानंतरही नियमानुसार या पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्ताना बाहेरील एका चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. हे वृत्तसमोर आल्यानंतर सोमवारी सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरु झाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तेथे तैनात 170 पोलिस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्या सर्वांचे अहवाल आता निगेटीव्ह आले आहेत. मात्र नियमानुसार त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
 
15 वसाहतींवर लक्ष

मुंबईतील तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्याता आले आहेत. या वेळी पोलिस वसाहतींकडे लक्ष देण्यात येत आहे. शहरातील15 पोलिस वसाहतींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. यातील 8 या कर्मचाऱ्यांच्या आहेत. तर 5 वसाहती अधिकाऱ्यांच्या आहेत. तसेच यातील 2 वसाहती पूर्णतः सील केल्या आहेत. 15 वसाहतींमध्ये एक दिवसाआड वैद्यकीय पथक जाऊन येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News