थप्पडचा ट्रेलर इंटरनेटवरून काढून टाका... तापसीची अनोखी मागणी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 February 2020

तापसी पन्नू ही दिल्लीहून मुंबईत येऊन बॉलीवूडमध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारी एक यशस्वी अभिनेत्री आहे. मनमार्जिया, मिशन मंगल, बदला, जुडवा २ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिचा येणारा  आगामी चित्रपट ‘ 'थप्पड' ’मुळे चर्चेत आली आहे.

मुंबई : तापसी पन्नू ही दिल्लीहून मुंबईत येऊन बॉलीवूडमध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारी एक यशस्वी अभिनेत्री आहे. मनमार्जिया, मिशन मंगल, बदला, जुडवा २ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिचा येणारा  आगामी चित्रपट ‘ 'थप्पड' ’मुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला असून नेहमीप्रमाणेच या चित्रपटातही तापसीने एक आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे. परंतु आता या ट्रेलरवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आणि मागणी स्वतः तापसीनेच केली असल्याचे सांगितले जात आहे. याचे कारण म्हणजे या ट्रेलरमध्ये एका महिलेवर थप्पड मारल्याचे दाखविले गेले आहे. आणि यूट्यूबच्याच्या नियमानुसार ही साधीसुधी बाब नाही. यामुळे हिंसाचाराला प्रोत्साहन मिळू शकते. असा रिपोर्ट तापसीने करत त्वरित हा व्हिडिओ काढून काढण्यात यावा असे आवाहन केले आहे. तापसीच्या या आगळ्यावेगळ्या मागणीमुळे अनेकांचा गोंधळ उडून गेला आहे.

 'थप्पड' हा आगामी चित्रपट घरामध्ये महिलांवर होणारे अत्याच्यार, अन्याय यांवर आधारित आहे. एका पार्टीमध्ये तिचा पती तिच्यावर हात उचलतो, म्हणून तापसी आपल्या पतीच्या विरुध्द तक्रार नोंदवते. समाजामध्ये असेलेलं स्त्रीचं दुय्यम स्थान आणि तिच्यावर तिच्या घरातूनच वारंवार होणाऱ्या अत्याचारांवर कशाप्रकारे आवाज उठवता येईल, हेच या चित्रपटातून दाखण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु ट्रेलरमधील काही दृश्य ही हिंसात्मक प्रवृत्तींना चालना देणारी आहेत. आणि अशा कोणत्याही व्हिडीओंना इंटरनेटवर स्थान देऊ नये. असे म्हणत तापसीने स्वतापासूनच या ट्रेलरला विरोध करण्याची सुरुवात केली आहे.   
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News