आठवण आईची

समीक्षा पाटील
Wednesday, 11 September 2019

तुझ्या कुशीत असताना वाटायचं खूप भारी
पण माहीत न्हवतं ग, मोठं झाल्यावर वेगळीच असते दुनियादारी

बालपणी आई तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण होते खास
तू कधी जवळ घेशील हीच असायची आस

इवल्याश्या डोळ्यांची नजर सतत तुला शोधायची,
तू कुठेही असलीस तरी तुझ्या येण्याची चाहूल मात्र आपोआप लागायची

तुझ्या कुशीत असताना वाटायचं खूप भारी
पण माहीत न्हवतं ग, मोठं झाल्यावर वेगळीच असते दुनियादारी,

लहान असताना तुझ्या हातचा मारही जाम भारी वाटायचा,
कितीही चुका केल्या तरी तू नाही अंतर देणार,

हा आत्मविश्वास असायचा, पण आता सरलं ते बालपण,
आणि राहिली ती फक्त आणि फक्त तुझी आठवण...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News