कोरोना संसर्गावर 'हा' उपाय गुणकारी ठरू शकणार  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • विशेष म्हणजे भारतातील हे पहिलेच संशोधन असल्याचा दावा रुग्णालयातील डॉक्‍टरांनी केला आहे.

मुंबई : कोरोना संसर्गावर गरम पाण्याची वाफ गुणकारी ठरू शकते, असे पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्‍टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. कोरोनाची साधारण लक्षणे, सौम्य लक्षणे किंवा ज्यांना अजिबात लक्षणे नाहीत त्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गरम पाण्याची वाफ घेणे उपयुक्त आहे, असे संशोधन इंडियन मेडिकल गॅजेटमध्येही प्रसिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतातील हे पहिलेच संशोधन असल्याचा दावा रुग्णालयातील डॉक्‍टरांनी केला आहे.

सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना 6 ते 7 दिवसांत उपचारांसह वाफ दिल्यामुळे फरक जाणवतो आणि ते निगेटिव्ह होऊन त्यांची तब्येत सुधारते. काहीच लक्षणे नसलेल्या 40 टक्के लोकांना याने लगेच फायदा मिळतो, असे संशोधन अहवालात सांगण्यात आले आहे.

सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्‍टरांनी एकूण 80 रुग्णांवर व दोन गटांमध्ये हा प्रयोग करण्यात आला. एका गटाला कोरोनावरील उपचारांसोबत गरम वाफ घेण्याचे सांगण्यात आले. यासाठी रुग्णांना प्रत्येकी एक स्टीमर दिला होता. त्याद्वारे दररोज 5 ते 10 मिनिटे आणि 5 ते 6 वेळा गरम वाफ घेतल्याने या रुग्णांमध्ये दुसऱ्या गटाच्या तुलनेत चांगला फरक दिसून आला. तसेच ते बरे होण्याचा वेग दुसऱ्या गटातील रुग्णांपेक्षा अधिक आढळून आला. गेले तीन महिने यावर अभ्यास केल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

स्टीम थेरपीचे फायदे
1) कोरोनाची लक्षण कमी होण्यास मदत होते.
2) शरीराचे तापमान वाढते. त्यातून संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकते आणि विषाणू मरू शकतो.
3) नाकात जळजळ होते. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सक्रिय होते.
4) थेरपीमुळे श्वासोच्छ्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होतो. यादरम्यान श्‍वासात ऍसेडिक आणि अल्कालाईन ही दोन घटक प्रभावी बनतात. यातील अल्कालाईनमध्ये कोरोना विषाणू जास्त काळ जगू शकत नाही. त्यामुळे तो नाहीसा देखील होऊ शकतो.

अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून स्टीम थेरपीचा वापर केला जाऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही थेरपी उपयुक्त ठरली आहे. प्रत्येक घरात ही माहिती पोहोचली पाहिजे. त्याचसोबत गरम पाणी प्यायल्याने घशातील जंतू मरू शकतात. ज्यांना लक्षणे नाहीत त्यांनी दिवसातून किमान दोन वेळा गरम वाफ घेतली पाहिजे. ज्यांना कमी किंवा सौम्य लक्षणे आहेत त्यांनी चार तासांनी घेतली पाहिजे आणि ज्यांना लक्षणे आहेत त्यांनी दर तीन तासांनी स्टीम आणि इतर उपचार घेतले पाहिजे.
- डॉ. दिलीप पवार, मानद सल्लागार, सेव्हन हिल रुग्णालय.

तीन महिन्यांच्या या कालावधीत 80 रुग्णांना स्वतंत्र स्टीमर देण्यात आले. दोन गटापैकी ज्या गटाला स्टीमर दिला होता ते वेगाने बरे होत गेले. त्यामुळे स्टीम थेरपीचा अतिरिक्त उपाय म्हणून वापर होऊ शकतो.
- डॉ. हर्षलकुमार महाजन, सहाय्यक प्राध्यापक, सेव्हन हिल रुग्णालय.

थेरपीमुळे संसर्गही कमी होतो
साधारण 56 ते 60 डिग्री अंश सेल्सिअस तापमानापर्यंत शरीरातील कोरोना विषाणू मरू शकतो. वाफेतील पाणी आणि उष्णता या दोन्ही घटकांमुळे या विषाणूला जिवंत राहणे कठीण जाते व त्याचा मृत्यूही होऊ शकतो. नाक, तोंड आणि दुर्मिळ प्रकरणात डोळ्यातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. नाकावाटे फुप्फुसात जाण्याचे प्रमाण जास्त आहे. पाणी किमान 100 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत तापवले जाते. नंतर ते नाकात घेताना वाफेचे तापमान 56 किंवा 60 डिग्रीच्या वरच असते. त्यामुळे कोरोना विषाणू निष्क्रीय होण्यास मदत होते. त्यातून संसर्गाचे प्रमाणही कमी होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News