नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षांकरीता आवश्यक असणारे ऍडमिट कार्ड रिलीज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020
  • कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांकडून नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.  
  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांची ही याचिका फेटाळून नीट आणि जेईई परीक्षा ह्या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होती असा निर्णय दिला.

नवी दिल्ली :- कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांकडून नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांची ही याचिका फेटाळून नीट आणि जेईई परीक्षा ह्या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होती असा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी होती. अनेक राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली, परंतु विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्व खबरदारी घेऊन नीट आणि जेईई परीक्षा ठरलेल्या तारखेला घेण्यात येणार आहे.

आज नीट परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून ऍडमिट कार्ड रिलीज करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूचा प्राधुरभाव लक्षात घेऊन १३ सप्टेंबर रोजी पारपडणाऱ्या नीट परिक्षेकरीता परीक्षा केंद्रांची संख्या ही २८४६ वरून ३८४३ इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रांवर जात असताना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुमारे २ तास लवकर उपस्तिथ राहावे लागणार असून पाण्याची बॉटल तसेच इतर साहित्य स्वतः आणावे लागणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर प्रत्येक विद्यार्थामध्ये ६ फूट अंतर ठेवणे गरजेचे असेल. 

नीट परीक्षांकरीता रिलीज करण्यात आलेले ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना https://ntaneet.nic.in/ntaneet/AdmitCard/AdmitCard.html ह्या लिंकवर जाऊन आपला अर्ज क्रमांक, पासवर्ड, जन्म तारीख इत्यादी माहिती भरायची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिसणार ऍडमिट कार्ड तपासून डाउनलोड करायचं आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने नीट आणि जेईई परीक्षांकरीता राज्यनिहाय सेंटर्सची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार कोरोनाच संकट लक्षात घेऊन गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जेईई परीक्षा केंद्राची संख्या ही ५७० वरून ६६० केली आहे, तर नीट परीक्षेसाठी यावर्षी १००० परीक्षा केंद्रांची वाढ करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News