हक्काचं नातं

माऊली शेळके
Wednesday, 5 August 2020

रक्ताचं नसलं तरी हक्काचं नातं मैत्री
एक मेकांचे विचार पटत नसले तरी त्यांचा आदर करणं म्हणजे मैत्री.

हक्काचं नातं

रक्ताचं नसलं तरी हक्काचं नातं मैत्री
एक मेकांचे विचार पटत नसले तरी त्यांचा आदर करणं म्हणजे मैत्री.
बालवाडी,शाळा,
कॉलेज ,नोकरी आणि परिवार
या सगळ्या नंतर पण राहते ती म्हणजे मैत्री.
सुखामध्ये असतात सगळे पण दुःखात जवळची असते 
ती मैत्री.

प्रत्येक नाती असतात स्वार्थी 
पण मैत्री असते निस्वार्थी,
पैसा असो अथवा नसो 
फक्त चहाच्या कटिंग वर टिकते 
ती मैत्री.

वय,वेळ,काळ आणि परिस्थिती 
हे काही बघत नाही 
ती असते मैत्री,
परिवार आणि नाती यांच्या मध्ये असलेल्या मतभेदांवर भाष्य करते ती असते मैत्री.

विद्यार्थी आणि शिक्षक, कर्मचारी आणि मालक यांच्यातील दुवा ती असते मैत्री,
एकमेकांना ओढ लावणारी आणि काळजी करणारी 
ती असते मैत्री.

नितळ पाण्यासारखी,
प्रत्येकाची तहान भागवणारी..
ती असते समुद्रा सारखी,प्रत्येकाला आपल्यात सामावून घेणारी..
ती असते हवे सारखी,प्रत्येकाला स्पर्श करणारी
ती असते सह्याद्री सारखी, प्रत्येक प्रसंगी खंबीरपणे उभी राहणारी..

कधी ती असते वितळणाऱ्या बर्फा सारखी तर कधी कठोर पाषाणा सारखी..
आपल्या रक्ताची नसते पण आपल्याला रक्त देणारी असते ती मैत्री..

एका- दोघांची नसते तर ती प्रत्येकाची असते अशी ती मैत्री!!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News