अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी नोंदणी सुरु?; असा करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

ज्या शाळांनी संकेतस्थळावर नोंदणी केली नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी प्रक्रीया पुर्ण करुन घ्यावी, त्यामुळे विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सोईस्कर होईल असे संचालनालयाने स्पष्ट केले.

मुंबई : आर्थिकदृष्या प्रतिकूल असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०-२१ वर्षाकरिता राज्यातील सर्व शाळांनी केवायसी अर्ज भरुन ऑनलाईन तपासणी करण्याचे आवाहन अल्पसंख्यांक शिक्षण संचालनालयाने केले. यंदापासून शाळांची ऑनलाईन नोंदणी आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी एनएसपी नावाचे नवीन संकेतस्थळ सुरु करण्यात आले. ज्या शाळांनी संकेतस्थळावर नोंदणी केली नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी प्रक्रीया पुर्ण करुन घ्यावी, त्यामुळे विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सोईस्कर होईल असे संचालनालयाने स्पष्ट केले.

राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे शिक्षणात प्रमाण वाढावे आणि कुटुंबावरचा आर्थिक भार कमी व्हावा, या करिता २००८-०९ या शैक्षणिक वर्षापासून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली. बौद्ध, जैन, शिख, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीय विद्यार्थ्यांचा समावेश अल्पसंख्यांक समुदायात होतो. अल्पसंख्यांक समुदायातील पहिली ते दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. 

अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी शाळांना एनएसपी पोर्टवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करणाऱ्या शाळांना सु्द्धा शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार आहे मात्र, भरलेल्या अर्जाची तपासणी केली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहू शकतो. त्यासाठी शाळांनी सर्व प्रथम केवायसी फार्म भरुन पडताळणी करुन घ्यावी. त्यानंतर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत अशा सुचना अल्पसंख्यांक संचालनायलयाकडून शाळांना देण्यात आल्या.   

विद्यार्थ्यांनी अर्ज करा करावा?

कुटुबांचे वार्षिक उत्त्पन्न १ लाखापेक्षा कमी असणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क करावा लागतो. मागील वर्षाचे गुणपत्रक, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, फोटे, बॅंक पासबुक मुख्याध्यापकांना सादर करावे लागते. या शिष्यवृत्तीचा लाभ कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांना घेता येते.  

अधिक माहितीसाठी- www.minorityaffairs.gov.in किंवा १८००११२००१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करु शकात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News