दीपिकासोबत काम करण्याबाबत अनन्या पांडे म्हणाली, "असं वाटतंच नाही की ती एक स्टार आहे"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 2 May 2020

लॉकडाउन लागू होण्यापूर्वी अनेक चित्रपटांवर काम सुरू झाले होते. काही दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांची नावे व त्यांच्या कलाकारांची नावे देखील फायनल करण्यात आली होती.

लॉकडाउन लागू होण्यापूर्वी अनेक चित्रपटांवर काम सुरू झाले होते. काही दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांची नावे व त्यांच्या कलाकारांची नावे देखील फायनल करण्यात आली होती. त्यातील एक म्हणजे दिग्दर्शक शकुन बत्रा, त्यांनी आपल्या आगामी चित्रपटातील कलाकारांची नावे निश्चित केली आहेत. या प्रोजेक्टमध्ये अनन्या पांडे पहिल्यांदाच दीपिका पादुकोणसोबत काम करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकासोबत काम करण्याबद्दल तिने आपले मत व्यक्त केले होते.

मुलाखतीत अनन्या म्हणाली
'तुम्हाला असं वाटणारच नाही की, ती एक स्टार आहे आणि ओव्हरपावर करतेय. तिच्यासोबत तुम्हाला अगदी मित्रासारखं वाटत.  दीपिका बाहेरील सौंदर्यापेक्षापण मनातून अधिक सुंदर आहे." यावेळी अनन्याने रणवीर सिंगसोबत काम करण्याची आणि हॉरर चित्रपट करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. अनन्या शकून बत्राच्या आगामी चित्रपटामुळे अत्यंत उत्साहित आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीसुद्धा आहेत. शकुन बत्राने यापूर्वी कपूर अँड सन्स आणि एक मैं और एक तू चित्रपट केले आहेत.

या फेमस साऊथ स्टारबरोबर काम करत आहे अनन्या
अनन्या पांडेबद्दल बोलायचं तर, ती नुकतेच "पती, पत्नी और वो" चित्रपटामध्ये दिसली होती. तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ईशान खट्टरसोबत "खाली-पिली" आणि विजय देवरकोंडा यांच्याबरोबर "फायटर" फिल्म आहे. दोन्ही चित्रपटांचे शूटींग सुरू झाले होते. फोटोसुद्धा समोर आले पण लॉकडाऊनमुळे त्यांचे शूटिंग अजूनही बंद आहे.
                                                                        
हा आहे दीपिकाचा पुढचा प्रोजेक्ट 
दीपिका पादुकोण कबीर खानच्या 83 चित्रपटात दिसणार आहे. यात रणवीर सिंगने माजी क्रिकेटर कपिल देव आणि दीपिकाने त्यांची पत्नी रोमी भाटियाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता पण लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. याशिवाय दीपिका महाभारत या चित्रपटातही काम करणार आहे. त्यामध्ये ती द्रौपदीची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News