पत्नी प्रियांकाच्या वयाबद्दल निक जोनस म्हणाला की...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

प्रियांकापेक्षा निक तब्ब्ल दहा वर्षाने लहान आहे. याबाबत निक जोनस पहिल्यांदाच बोलला आहे.  

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस यांच्या लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत ठरली आहे. अनेक ठिकाणी हे कपल सोबत असल्याचं पाहायला मिळत. या दोघांच्या लग्नाच्या वेळेस सर्वात जास्त चर्चा झाली होती ती, या दोघांच्या वयाची..! प्रियांका आणि निकच्या वयात तब्ब्ल १० वर्षांचं अंतर आहे. प्रियांकापेक्षा निक तब्ब्ल दहा वर्षाने लहान आहे. याबाबत निक जोनस पहिल्यांदाच बोलला आहे.  

'द व्हॉइस' या रियालिटी शो मध्ये निक परीक्षकांच्या भूमिकेत आहे. या शो मध्ये त्याच्यासोबत क्लार्कसन या गायिका देखील आहेत. यावेळी  क्लार्कसनने मी ३७ वर्षांची आहे, तर निक २७ वर्षांचा आहे, असं म्हणताच निक म्हणाला की, माझी पत्नी  देखील ३७ वर्षांची आहे. 

निकची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २०१८ निक आणि प्रियांकाचे लग्न झाले आहे. या वयाच्या अंतरामुळे लग्नाच्या वेळी दोघेही वयाच्या अंतरामुळे चर्चेत आले होते. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी टीका देखील करण्यात आली होती. मात्र या टीकेकडे लक्ष न देता त्यांनी दुर्लक्ष केले.  

दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपले फोटो सतत शेअर करताना दिसतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News