हार्दिक पटेल 'या' पक्षाच्या वाटेवर ? लवकरच पक्ष प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा घवघीत यश मिळवून दिले, सद्या आम आदमी पक्ष इतर राज्यात हात पसरवायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील तडफदार नेतृत्व हार्दिक पटेल आपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीनंतर खरंतर हार्दिक पटेल यांनी अरविंद केजरीवाल फोटो शेअर करून अभिनंदन केलं होतं. त्याच्यानंतर देशाच्या राजकारणात हार्दिक पटेल प्रवेश करेल या चर्चेला देशभर उधान आले होते. परंतु पाटीदार समाजाच्या काही तुरळक नेत्यांनी ते कॉंग्रेससोबत कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. 

आपचे काही नेते मार्च महिना अखेरीस गुजरातची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यावेळी हार्दिक पटेल यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात येईल अशी सुध्दा चर्चा मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये रंगत आहे. 

पुढील काही दिवसात राज्यसभेच्या चार जागांसाठी लढत होणार नाही. कॉंग्रेसवर दबाव वाढवण्यासाठी हार्दिक पटेल यांच्याकडून अशी अफवा व्हायरल केली जात असल्याचे काही टीकाकारांचे म्हणणे आहे. 

मागील महिन्यात हार्दिक पटेल यांचं अपहरण झाल्याचे त्यांच्या पत्नीने जाहीर केले होते. हार्दीक पटेल यांच्यावरती आत्तापर्यंत २० खटले दाखल आहेत. त्यापैकी २ देशद्रोहाशी निगडीत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News