लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीनं चिरला कोयत्याने गळा  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

महंतेश बिराजदार (२७) असं प्रियकराचं नाव असून त्याचं कित्येक वर्षांपासून आरोपीसोबत प्रेम होते. प्रेमात आकंड बुडालेल्या प्रेयसीनं प्रियकराला लग्नासाठी विचारले.

पुणे - लग्नाला नकार दिल्याने एका महिलेने प्रियकराचा चक्क गळा कोयत्याने कापल्याची नुकतीच पुण्यात उघडकीस आली आहे. सिंहगड भागातील न-हे परिसरात ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर प्रेयसी स्वत: सिंहगड पोलिस ठाण्यात हजर झाली आहे. विशेष म्हणजे प्रेयसीने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फसल्याने ती पोलिस ठाण्यात हजर झाली. 

महंतेश बिराजदार (२७) असं प्रियकराचं नाव असून त्याचं कित्येक वर्षांपासून आरोपीसोबत प्रेम होते. प्रेमात आकंड बुडालेल्या प्रेयसीनं प्रियकराला लग्नासाठी विचारले. पण प्रियकराने नकार दिल्याने ती नैराश्येत होती. रागात असलेल्या प्रेयसीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रियकर ऐकून घेत नसल्याने त्याचा गळा चिरल्याची कबूली प्रेयसीने पोलिसांना दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News