विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करा ! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 10 May 2020
  • विद्यार्थी नेता वैभव उबाळे यांनी मागणी

मुंबई : अंतिम वर्ष सोडून विद्यापीठाच्या इतर सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. मात्र, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी भरलेली फी विद्यापीठ प्रशासनाने परत करावी अशी मागणी विद्यार्थी नेता वैभव उबाळे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांना केली.

मुलांना शिकवण्यासाठी पालक काबाड कष्ट करुन प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी भरतात. दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांना शिक्षणाचा खर्च परवड नाही. लॉकडाऊनमुळे सर्व रोजगार बंद झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा फी विद्यापीठाने माफ करावी. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना आर्थिक मदत होईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

बी. ए, बी. कॉम आणि बी. एससी अभ्यासक्रम तीन वर्ष कालावधी असतो, त्यात सहा सेमीस्टर असतात. त्यातल्या सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेणार आहे. जिथे आठ सेमीस्टर आहेत तिथे आठव्या सेमीस्टरची परीक्षा होणार आहे, दहा सेमीस्टर असतील तिथे १० व्या सेमीस्टरची परीक्षा घेणार आहे. एम. ए, एम. कॉम आणि इतर २ वर्षांच्या कोर्ससाठी चार सेमीस्टर आहेत. तिथे चौथ्या सेमीस्टरची परीक्षा होणार आहे. डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. त्यात सहा सेमिस्टर असतात. सहाव्या सेमीस्टरची परीक्षा होईल. सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्गात प्रवेश मिळणार आहे, मात्र नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा या १ ते ३१ जुलै दरम्यान होतील. मात्र लॉकडाउनची स्थिती कायम राहिल्यास २० जूनच्या आसपास बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News