रेडमी नोट 9 स्मार्टफोनची विक्री सुरू; सर्वसाधारण ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020

रेडमी नोट ९ या स्मार्टफोनमध्ये चार जीबी रॅम आणि 63 जीबीपर्यंत एक्स्टर्नल मेमरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे.

तरुणाईचा सर्वाधिक लोकप्रिय रेडमी नोट ९ स्मार्टफोन विक्री आजपासून (गुरुवार ता.20)  सुरु झाली. ऍमेझॉन आणि शाओमी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर खरेदी करता येणार आहे. गेल्या महिन्यामध्ये हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला. त्याची विक्री आता पुन्हा सुरू झाली. रेडमी नोट ९ या स्मार्टफोनमध्ये चार जीबी रॅम आणि ६४ जीबीपर्यंत एक्स्टर्नल मेमरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. चार जीबी रॅम १२८ जीबी इंटरनल मेमरी स्मार्टफोनची किंमत १३ हजार ४९९ ठेवण्यात आली.  रेडमी नोट ९ लेटेस्ट मॉडेल सोळा जीबी रॅम १२८ जीबी इंटरनल मेमरी आहे. त्याची किंमत १४ हजार ९९९ रुपये ठरवण्यात आली. हे स्मार्टफोन चार कलरमध्ये ग्राहकांना मिळणार आहेत. एक्वा ग्रीन, आर्कटिक वाईट, पेबल ग्रे आणि स्कारलेट लाल यामध्ये उपलब्ध आहे.

जाणून घ्या फिचर

रेडमी नोट ९ स्मार्टफोन ६जीबी एलपीडीडीआरचार एक्स रॅम सोबत मीडियाटेक हेलीओ जी ८५ प्रोसेसर देण्यात आले. दोन मायक्रो सीम कार्ड आणि अँड्रॉइड दहा वेस्ट एमआययुआयवर चालणार आहे.  ६. ५३ इंट पुर्ण एचडी डिस्प्ले देण्यात आला. १२८ जीबी पर्यंत एका मायक्रो कार्डद्वारे  मेमरीची क्षमता वाढवण्याची येणार आहे.

फोटोग्राफीसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला. प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे त्याचबरोबर 8 मेगापिक्सल अल्ट्रा व्हाईट अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल सेंसर कॉमेरा देण्यात आला. सेल्फीसाठी स्पेशल तेरा मेगाफिक्सल कॉमेरा देण्यात आला. बॅटरी क्षमता 5200 एमएएच आहे. 22.5 व्हॅट चार्जिंग सपोर्ट आहे. फिंगरप्रिंट सेंसर मोबाईलमध्ये देण्यात आले. हा मोबाईल कमी किमतीमध्ये सर्वोत्तम फॅसिलिटी देणारा आहे, त्यामुळे सर्वसाधारण ग्राहक डोळ्यासमोर ठेवून कंपनीने हा मोबाईल लॉन्च केला. मात्र ग्राहक किती आकर्षित होतील हे येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News