पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 July 2020
  • कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोक-या सुटल्याचे चित्र आहे, अशातचं पश्चिम रेल्वेने विविध पदं भरणार असल्याची घोषणा केली आहे.
  • विशेष म्हणजे ज्युनिअर टेक्निकल असोसिएट्मधली विविध पदं भरण्यात येणार असून पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.

मुंबई - कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोक-या सुटल्याचे चित्र आहे, अशातचं पश्चिम रेल्वेने विविध पदं भरणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ज्युनिअर टेक्निकल असोसिएट्मधली विविध पदं भरण्यात येणार असून पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे. या पदांसाठी वयोमर्यादा १८ पासून ३३ ते ३८ पदांनुसार देण्यात आली आहे. 

ज्युनिअर टेक्निकल असोसिएटच्या ४१ पदांसाठी पश्चिम रेल्वेने अर्ज मागविले असून या पदांची विभागणी सुध्दा करण्यात आली आहे. ज्युनिअर टेक्निकल असोसिएट वर्क्स - १९ पदे
ज्युनिअर टेक्निकल असोसिएट इलेक्ट्रिकल - १२ पदे
ज्युनिअर टेक्निकल असोसिएट टेलिकम्युनिकेशन/एस अॅंड टी - १० पदे 

वरती दिलेल्या सर्व पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली संपुर्ण माहिती भरावी. माहिती दिलेल्या पदानुसार भरावी. अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतला किंवा विद्यापीठातला असावा. त्याने तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा चार वर्षाची बॅचलर पदवी मिळवलेली असावी. उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे संपुर्ण माहिती वाचल्याशिवाय अर्ज भरू नये.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News