केंद्रीय राखीव पोलिस दलात विविध पदांवर भरती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 July 2020

ही सर्व पदे लेखी परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

केंद्रीय राखीव पोलिस दलात विविध पदांवर भरती 

केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पॅरामेडिकल स्टाफसह विविध पदं भरण्यात येणार आहेत. भरतीबाबतची अधिकृत माहिती केंद्रीय राखीव पोलिस दलाने crpf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली असून नियुक्त झालेल्या उमेदवाराला प्रती महिना १.४२ लाखापर्यंत पगार मिळेल. 

कोरोनाच्या काळात उमेदवारांना ही चांगली संधी असून जे उमेदवार या पदांसाठी पात्र असतील अशांनी तात्काळ संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. संकेतस्थळावर कोणती पदे भरली जाणार आहेत. तसेच अर्जाची अंतिम तारीख काय, त्यासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज कसा भरायचा इत्यादी माहिती अधिकृत संकेतस्थळावर आहे. 

इतकी पदे भरली जाणार 

निरीक्षक (डाएटिशियन) - १ पद
उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) - १७५ पदे
उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) - ८ पदे
सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) - ८४ पदे
सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) - ५ पदे
सहाय्यक सब इन्स्पेक्टर (डेंटल टेक्नीशियन) - ४ पदे
सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब टेक्निशियन) - ६४ पदे
सहाय्यक उपनिरीक्षक / इलेक्ट्रो कार्डिओग्राफी तंत्रज्ञ - १ पद
हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी / नर्सिंग सहाय्यक / वैद्यक) - ८८ पदे
हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ - ३ पदे
हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्नीशियन) - ८ पदे
हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे सहायक) - ८४ पदे
हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) - ५ पदे
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) - १ पद
हेड कॉन्स्टेबल (स्टीवर्ड) - ३ पदे
कॉन्स्टेबल - ४ पदे
कॉन्स्टेबल (कुक) - ११६ पदे
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) - १२१ पदे
कॉन्स्टेबल (धोबी) - ५ पदे
कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) - ३ पदे
कॉन्स्टेबल (टेबल बॉय) ) - १ पद
हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - ३ पदे
एकूण पदांची संख्या - ७८९

वरती दिलेली सर्व पदे केंद्रीय राखीव पोलिस दलात भरण्यात येणार आहेत. ही सर्व पदे लेखी परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. २० जुलै २०२० नंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. तसेच ३१ ऑगस्ट पर्यंत पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News