'या' विद्यापीठात अनेक पदांची भरती; भरघोस पगार आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 April 2020

तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात राहून नोकरी करायची आहे? तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. मोठं-मोठ्या पर्वतरांगांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात काम करता येणार आहे. केंद्रीय काश्मीर विद्यापीठात (CUK ) अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात राहून नोकरी करायची आहे? तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. मोठं-मोठ्या पर्वतरांगांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात काम करता येणार आहे. केंद्रीय काश्मीर विद्यापीठात (CUK ) अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याठिकाणी ग्रंथपाल, उप ग्रंथपाल व इतर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर (सीयूके) भरती 2020 साठी 17 मे 2020 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना नवीन पेन्शन सिस्टम (एनपीएस) नुसार पगार देण्यात येणार आहे. 

महत्त्वाची तारीख
CUK मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख : १७ मे २०२०

या पदांची भरती 
लायब्रेरियन : 01 पद
डेप्युटी लायब्रेरियन: 01 पद
असिस्टंट रजिस्ट्रार: 01 पद
खासगी सचिव: 01 पद
व्यक्तिगत सहायक: 02 पद
तांत्रिकी सहायक: 01 पद
प्रयोगशाळा सहायक: 01 पद
पुस्तकालय सहायक: 01 पद·        

अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी १७ मे २०२० पर्यंत  किंवा त्यापूर्वी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर (CUK) भरती २०२० साठी अर्ज करावेत. 

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या : http://www.cukashmir.ac.in/#

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News