इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 July 2020

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये कनिष्ठ कारागीर, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यकांची पदे रिक्त केली आहेत. त्यानुसार ज्युनियर कारागीरच्या 3 आणि तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिकाची १ पदे असतील. त्याचबरोबर या पदांवर उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये कनिष्ठ कारागीर, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यकांची पदे रिक्त केली आहेत. त्यानुसार ज्युनियर कारागीरच्या 3 आणि तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिकाची १ पदे असतील. त्याचबरोबर या पदांवर उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल.

शैक्षणिक पात्रता :-

कनिष्ठ कारागीर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये फूलटाईम डिप्लोमा किंवा संगणक विज्ञान इंजिनिरिंगमध्ये ६०% गुण असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २६ वर्षे असणे आवश्यक आहे. याशिवाय आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासनाच्या सूचनेनुसार सवलत देण्यात येणार आहे. तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून फिटर ट्रेडमध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरही अनेक विभागांत नोकरीसाठी रिक्त पद आहेत. त्याअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) एकूण २६६ पदांसाठी भरती निघाली आहे. त्याअंतर्गत १४२ सहाय्यक प्राध्यापक, ८३ सहकारी प्राध्यापक, ३८ प्राध्यापक, २ सहाय्यक ग्रंथपाल आणि १ ग्रंथपाल यांच्यासाठी नेमणुका करण्यात येतील. त्याअंतर्गत प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर आणि पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. ग्रंथालयासाठी अर्जदाराकडे ग्रंथालय विज्ञान, माहिती विज्ञान, दस्तऐवजीकरण विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह असणे आवश्यक आहे.

मुलाखत येथे असेल

इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्यासाठी १६ जुलै रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे. या दिवशी, उमेदवारांना संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रांसह ईसीआयएल झोनल कार्यालय, क्रमांक १/१, २ रा मजला, एलआयसी बिल्डिंग, संपिग रोड, मल्लेस्वरम, बेंगलुरू - ५६०००३ वर पोहोचावे लागेल.

एवढा असेल पगार

• तांत्रिक सहाय्यक – १९८६४
• कनिष्ठ कारागीर - १८०७०

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News