भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020
  • कोरोनाच्या काळात नोकरीची समस्या अधिक जटील होऊन बसली आहे.
  • नोक-या गेल्याने अनेक तरूण निराश झाले आहेत, तर काहीजण पटकन नोकरी कशी लागेल याच्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
  • विशेष म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये अनेक पदं भरण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या काळात नोकरीची समस्या अधिक जटील होऊन बसली आहे. नोक-या गेल्याने अनेक तरूण निराश झाले आहेत, तर काहीजण पटकन नोकरी कशी लागेल याच्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये अनेक पदं भरण्यात येणार आहेत. इंजिनीअर आणि ट्रेनी इंजिनीअर या दोन पदांसाठी ही भरती होणार असून पात्रता असलेल्या  उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर त्वरित अर्ज करावा. 

बीईएलची अधिकृत वेबसाइट bel-india.in ही असून भरतीची संपुर्ण प्रक्रिया या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पात्रता असलेल्या उमेवारांनी संपुर्ण माहिती वाचून आपला अर्ज भरावा. भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्याचबरोबर २२ जुलै २०२० पासून ही प्रक्रिया सुरू केली असून २ ऑगस्ट २०२० ही अर्ज करण्याची अंतिम तारिख आहे. 

ट्रेनी इंजिनीअरसाठी २०० रुपये, तर प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवार विनामुल्य अर्ज भरू शकतात. ट्रेनी इंजिनीअरसाठी उमेदवाराचे वय २५ असावे तर प्रोजेक्टे इंजिनीअरसाठी २८ वय असावे अशी अट कंपनीने घातली आहे. 

उमेदवारांकडे मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठाची बीई किंवा बीटेक् पदवी आवश्यक. बीई किंवा बीटेक् इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इ अँड टी / टेलीकम्युनिकेशन / ईईई / मेकॅनिकल शाखेतून केलेले असावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News