आरोग्य विभागात ७वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती; येथे करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

सातवी पास ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेची संधी मिळणार आहे.

सोलापूर : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे संसाधने आणि मणूष्यबळ असल्यामुळे आरोग्य विभागाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहे. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कोविड केअर सेंटर आणि युपीएच सेंटरमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. या जागा केवळ ६ महिन्यासाठी तात्पुर्त्या स्वरुप आहेत. सातवी पास ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेची संधी मिळणार आहे.

पदाचे नाव आणि तपशील :  

अनु. क्र    पदांचे नाव                 पदे
१.        वैद्यकीय अधिकारी          १०                     
२.    आयुश वैद्यकीय अधिकारी    २५
३.          स्टाफ नर्स GNM         १५
४.        स्टाफ नर्स ANM           २५
५.        परिचर/ वार्डबाय           ३०        

शैक्षणिक पात्रता :

अनु. क्र.१ :  
एमबीबीएस/ पीजी कोणत्याही विषयात
वेतन- ५० हजार

अनु. क्र.२ :  
बीएएमएस/ बयुएमएस, बीएचएमएस
वेतन- ४० हजार

अनु. क्र.३ :  
बारावी पास व जीएनएम कोर्स उत्तीर्ण आसावा. 
किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक
वेतन- २० हजार

अनु. क्र. ४ :  
दहावी पास व एएनएम कोर्स उत्तीर्ण आसावा. 
किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक
वेतन- १८ हजार

अनु. क्र. ५ :  
सातवी पास असावा
प्रथमोपचाराने ज्ञान असणे आवश्यक
वैद्यकीय क्षेत्रातला किमान दोन वर्षाचा अनुभव असावा
वेतन- १० हजार

वयोमर्यादा: उमेदवारांचे वय ४५ वर्षापेक्षा अधिक नसावे.

अर्ज करण्याची शेवटती तारीख: 

२५ जुलै २०२० सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

अर्ज कसा करावा :

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय देण्यात आले. उमेदवारांनी ए४ पानावर सर्व माहिती लिहून किंवा दिलेला अर्जाचा नमुना भरून smegados2@gmail.com या ईमेलवर सेंड करावा लागणार आहे. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, पासपोर्ट साईज फोटो चिटकावून पीडीए स्वरुप सादर करायचा आहे. 

ऑफलाईन अर्ज येथे दाखल करा :

सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन, सोलापूर 

अधिक माहतीसाठी:  http://www.solapurcorporation.gov.in/

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

https://drive.google.com/file/d/1VWGKOLCQnRnm16qmC8U5Wh-c1WBvEZbO/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News