कोचीन शिपयार्ड कंपनीत ५७७ पदांसाठी भरती; तरुणांना रोजगारची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 27 September 2020

कोची येथील शिपयार्ड लिमीटेड विविध ट्रेंडच्या १८० जागांसाठी जाहीरात निघाली आहे, इच्छूक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नामवंत शासकीय आणि खासजी कंपनीत फक्त शिक्षणावर नोकरी मिळत नाही, तर शिक्षणाबरोबर काही कौशल्य, अनुभव आवश्यक असतात. त्यासाठी शिकाऊ उमेदवार (apprenticeship) म्हणून विद्यार्थ्यांना काही महिने ऑनफिल्ड काम करावे लागते. अप्रेंडशिप काळात विद्यार्थ्यांना कंपनीत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना उदर्निवाहासाठी मानधन, सेवा- सुविधा दिल्या जातात. यशस्वीरित्या प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र आणि नोकरीची संधी मिळते. त्यामुळे अप्रेंडशिप कालाधील विविध कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. कोची येथील शिपयार्ड लिमीटेड विविध ट्रेंडच्या १८० जागांसाठी जाहीरात निघाली आहे, इच्छूक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या जागा केवळ तात्पूर्त्या स्वरुपाच्या आहेत.

पदाचे नाव आणि तपशील :

अनु.क्र    पदांचे नाव              पदे

१.     शिट मेटल वर्कर            ८८

२.       वेल्डर                         ७१   

३.       फिटर                         ३१      

४.       मेकॉनिक डिझल          ३०                 

५.    मेकॉनिक मोटर मेकॅनिक  ०६             

६.      फिटर पाईप    २१               

७.            पेंटर                     १३

८.      इलेक्ट्रीशियन               ६३

९.       क्रेन ऑपरेटर              १९

१०.     इलेक्ट्रोनिक मशिन       ६५

११.    इन्ट्रूमेन्ट मशिन              ६५

१२.    शिपराईट वूड               १५

१३.    मशिनिस्ट                     ११

१४.   अटो इलेक्ट्रोनिक           ०२

१५.   क्रॉफ ओल्डर          १९

१६. एरियल वर्कर प्लॉटफार्म ऑपरेटर  २

१७. सेमी स्किलड रिगर     ५३

१८.      सेरंग        २

१९. कुक ऑफ सीएलएल गेस्ट हाऊस  १

पात्रता : 

  • दहावी पास, 
  • संबंधिक विषयात आयटीआय कोर्स उत्तीर्ण.
  • संबंधित कामाचा तीन वर्षे अनुभव

प्रशिक्षणाचा कालावधी: 

  • जास्तीजास्त ३ वर्ष

मानधन:

  • प्रथम वर्ष - 23300   + अतिक्त काम 4900/-
  • द्वितीय वर्षे- 24000  + अतिक्त काम 5000/-
  • तृतीय वर्षे -  24800  + अतिक्त काम  5100/-

निवड प्रक्रीया:

उमेदवरांची निवड प्रक्रीय तीन टप्यात होणार आहे. पहिला टप्पा विद्यार्थ्यांची ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन परीक्षा, दुसरा टप्पा प्रॉक्टीकल टेस्ट तर दोन्ही परीक्षांचे एकत्रित गुण करुन आयटीआयचे मार्क मिसळले जातील. सर्व मार्कांची एकूण सरासरी काढून गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 

  • आयटीआय मार्क - २० टक्के
  • ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट - ३० टक्के 
  • प्रॉक्टीकल टेस्ट - ५० टक्के

शुल्क

  • सर्वसामान्य उमेदवरांसाठी ३०० रुपये
  • एससी, एसटी, दिव्यांग उमेदवारांना विनाशुल्क

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 

  • १० ऑक्टोबर २०२०

अर्ज कसा करावा

उमेदवारांनी https://cochinshipyard.com/ या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज कारावा. पहल्या टप्यात नाव नोंदणी करावी तर दुसऱ्या टप्प्यात सविस्तर अर्ज भरावा.

india

भारत
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News