नवोदय विद्यालयात ४५४ टिचर पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 4 September 2020

ज्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर, शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमात 50 टक्के गुण मिळविले आहेत अशा विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अर्ज करता येतो. 

शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणार्‍या तरुणाईसाठी राज्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शासकीय नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. केंद्रीय शिक्षा मंत्रालयाअंतर्गत शाळा अभियान राबवले जाते. या अभियानाद्वारे जवाहर नवोदय विद्यालयात ४५४ पदांसाठी जाहीरात निघाली. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर, शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमात 50 टक्के गुण मिळविले आहेत अशा विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अर्ज करता येतो. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 सप्टेंबर 2020 

पदाचा तपशिल, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

पदाचे नाव आणि तपशील :

अनु. क्र    पदांचे नाव    पदे

(PGT) पोस्ट ग्रॉज्युएट 

१.     हिंदी    १६                     

२.      इंग्रजी    ०६

३.      बायोलॉजी    १७         

४.     केमिस्ट्री     १५   

५.      अर्थशास्त्र        ०३

६.        भूगोल     ०६

७.     इतिहास    १०

८.    आय. टी    ०२

९.    गणित     १०

१०.    फिजिक्स    १४

(TGT) ट्रेंन्ड ग्रॉज्युयट टिचर

११.     हिंदी    ४८    

१२.     इंग्रजी     ३१

१३.     गणित     ४८

१४.     विज्ञान     २८ 

१५.     सामाजिक शास्त्र ३२ 

१६.    मराठी     ०८ 

१७.      गुजराती     १३    

१८.     कला     १७

१९.    संगीत     १३ 

२०.     पेट पुरुष      २०

२१     पेट महिला        १३

२२.    ग्रंथालय    १२ 

२३.     एफसीएस    ७३

शैक्षणिक पात्रता आणि वेतन

(PGT) पोस्ट ग्रॉज्युएट : ९८

 • दोन वर्षाचा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स, मान्यप्राप्त विद्यापीठ, संस्थेमधून पुर्ण किंवा/
 • एनसीईआरटीईची मान्यता असलेल्या विद्यापीठ, संस्थेमधून पदव्युत्तर/ 
 • विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयांमध्ये कमीत कमी ५० टक्के गुण अनिवार्य /
 • बी.एड् आणि दिलेल्या विषयात पदव्युत्तर पदवी ५० टक्के गुणासह उत्तीर्ण 
 • वेतन-  २७ हजार ५०० अतिदुर्गम भागासाठी ३२ हजार ५००

(TGT) ट्रेंन्ड ग्रॉज्युएट टिचर:  ३८३

 • चार वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स  एनसीआरटीची मान्यता असलेल्या विद्यापीठातून पुर्ण/
 • विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयांमध्ये कमीत कमी ५० टक्के गुण अनिवार्य /
 • ज्या विषयासाठी उमेदवार अर्ज करणार आहे तो विषय पदवीला असावा
 • २ किंवा ३ वर्षे त्या विषयाचा अभ्यास केलेला असावा/ 
 • बी. एड् उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करु शकतात.
 • वेतन-  २६ हजार २५० अतिदुर्गम भागासाठी ३१ हजार २५०

अर्ज कसा करावा

जाहीरातीसोबत अर्जाचा नमुना दिला आहे. अर्ज स्व- हस्ताक्षरात किंवा टंकलीखीत भरावा. त्यासोबत शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव यांच्या झेरॉक्स प्रतिवर स्व साक्षांकीत करुन क्लस्टर सेंटरवर मेल करावा. 

 
संपुर्ण जहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News