भारतीय रेल्वेत ३५ हजार जागांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

भारतीय रेल्वेत ३५ हजार जागांची भरती

भारतीय रेल्वेत ३५ हजार जागांची भरती

कोरोनाच्या काळात अनेकांनी नोकरी गमावली आहे, तसेच काहीजण कमी पगारात नोकरी करीत आहेत. कोरोनाच्या काळात अनेकजण बिनपगारी सुध्दा नोकरी करीत आहेत. अशा काळात रेल्वेने भरती जाहीर केली आहे. रोजगाराची ही सुवर्णसंधी असून पदवीधर असणा-या आणि नसणा-या तरूणांसाठी ही भरती होणार आहे. रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्यूलर कॅटेगरी अंतर्गत ३५  हजार २०८ जागांसाठी नोकरभरती होणार आहे. यामध्ये ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणाार आहे.

क्लार्क कम टायपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टायपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अ‍ॅप्रेंटिस आणि स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल. अधिक माहिती रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

१८ ते ३३ वयातील सर्वसाधारण तरूण अर्ज करू शकतील. ओबीसीसाठी १८ ते ३६ वर्षे वयाची अट ठेवण्यात आली आहे. अनुसूचित जमातीसाठी १८ ते ३८ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News