सांगली जिल्हा आरोग्य विभागात ३३५ जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने जाहीरात काढली आहे.  या जागा केवळ तात्पुर्त्या स्वरुप आहेत. त्याचा कालावधी तीन महिन्याचा असेल. थेट मुलाखीद्वारे या जागा भरण्यात येतील.  

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे संसाधने आणि मणूष्यबळ असल्यामुळे आरोग्य विभागाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांचा अतिरिक्त भार डॉक्टरांना सहन करावा लागतो. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने जाहीरात काढली आहे.  या जागा केवळ तात्पुर्त्या स्वरुप आहेत. त्याचा कालावधी तीन महिन्याचा असेल. थेट मुलाखीद्वारे या जागा भरण्यात येतील.  

पदाचे नाव आणि तपशील:  

अनु. क्र    पदांचे नाव    पदे
१.    फिजिशियन    २७                      
२.    भूलतज्ज्ञ        २७
३.    मेडीकल ऑफिसर    २१०
४    आयुश एमओ    ७०        

शैक्षणिक पात्रता:

अनु. क्र.१ :  

एमबीबीएस/ एमडी असावा
वय ५० पेक्षा अधिक नसावे
वेतन- ७५ हजार

अनु. क्र.२ :  

उमेदवार एमबीबीएस आणि एमडी असावा
भुलतज्ज्ञ पदविका असावा.
वय ५० पेक्षा अधिक नसावे
वेतन- ७५ हजार

अनु. क्र.३ :  

एमबीबीएस असावा. 
वय ५० पेक्षा अधिक नसावे
वेतन- ६० हजार

अनु. क्र. ४ :  

बीएएमएस/ बीयूएमएस असावा
वय ५० पेक्षा अधिक नसावे
वेतन- ३० हजार

मुलाखतीची तारीख : 

१४ जुलै  2020
सकाळी 10  

मुलाखतीचे स्थळ:

 आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली.

अर्ज कसा करावा

उमेदवारांनी ए४ पानावर सर्व माहिती लिहून किंवा टाईप करुन प्रत्यक्ष सादर करावी. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, पासपोर्ट साईज फोटो चिटकावून मुलाखती वेळी सोबत आणावा. एका उमेदवारांनी एकाच पदासाठी अर्ज करावा. 

अधिक माहितीसाठी : https://drive.google.com/file/d/1iJZK1M-3ZFySDQhwSpHAwtHKDFovrh11/view
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News