BOI मध्ये 244 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 18 September 2020

पदे, पात्रता, परीक्षा शुल्क, निवड प्रक्रीय या संदर्भात जाणून घेऊया सविस्तर माहिती. 

मुंबई : संपूर्ण देशात बेरोजगारीचा दर वाढत आहे. अशा परिस्थितीत बँक ऑफ इंडियाने रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी बँक ऑफ इंडियाने 244 पदांसाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली. ही पदे अधिकारी लेवलची आहेत. त्यामुळे उमेदवरांना अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. या संधीच सोन करण्याची सुवर्ण संधी तरुणाईला मिळाली आहे. पदे, पात्रता, परीक्षा शुल्क, निवड प्रक्रीय या संदर्भात जाणून घेऊया सविस्तर माहिती. 

पदाचे नाव आणि तपशील :

अनु.क्र    पदांचे नाव           पदे

1.    क्रेडिट ऑफिसर                 79
2.    रिस्क मॅनेजर                      09
3.    क्रेडिट अॅनालिस्ट              60
4.     इकॉनॉमिक्स/ स्टॅटिस्टिक     96 

परीक्षा शुल्क 

  • सर्वसाधारण उमेदवारांनासाठी 850 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले
  • अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) इतर मागास वर्ग (OBC) उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क आकारण्यात आले 

कशी होणार परीक्षा 

  • उमेदवरांची परीक्षा मुख्य आणि मुलाखत दोन टप्प्यांत होणार आहे. 
  • परीक्षेत मिळालेल्या गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल. 
  • उमेदवारांची मुख्य परीक्षा 1 तास 50 मिनिटाची असेल. 
  • इंग्रजी भाषेला 50 गुण, जनरल नॉलेज  50 गुण, प्रोफेशनल नॉलेज 75 गुण अशी मार्कांची विभागणी करण्यात आली. 
  • इंग्रजी व्यतिरिक्त अन्य पेपर हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतील. 
  • इंग्रजी भाषेत मिळालेले गुण मिरीट लिस्टमध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत. 
  • परीक्षेला निगेटिव्ह गुणांकन पद्धती असणार नाही.

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी बँक ऑफ इंडियाच्या https://www.bankofindia.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Career चा पर्याय निवडावा. त्यानंतर Recruitment of Officers in various streams up to Scale IV- Project No. 2020-21/2 Notice dated 01.09.2020 यावर क्लिक करावे, एक नवीन पेज ओपन होईल. त्यात CLICK for apply online वर क्लिक करावे. त्यानंतर सविस्तर जाहीरात, ऑनलाईन नोंदणी अर्ज दिसेल. उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती सविस्तर भरुन फोटो, स्वाक्षरी अपलोड करावी. त्यानंतर फि भरुन अर्ज सबमीट करावा. उमेदवारांनी नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर वेळोवेळी लघू संदेश पाठवला जाणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2020

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News