बृहन्मुंबई महानगरपालिकेत २०३ जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 12 July 2020

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोना रुग्णांसाठी 'विशेष कोव्हीड उपाचर केंद्र' आणि 'स्पेशल रुग्णालये' स्थापन केली. अशा रुग्णालयात निम- वैद्यकीय संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे संसाधने आणि मणूष्यबळ असल्यामुळे आरोग्य विभागाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांचा अतिरिक्त भार डॉक्टरांना सहन करावा लागतो.

ग्रामीन भागत अशी परिस्थिती असली तरी कोरोनामुळे मुंबई शहरात या पेक्षा बिकस परिस्थिती निर्माण झाली. राज्यातील सर्वांधिक रुग्ण मुंबई शहरात आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोना रुग्णांसाठी 'विशेष कोव्हीड उपाचर केंद्र' आणि 'स्पेशल रुग्णालये' स्थापन केली. अशा रुग्णालयात निम- वैद्यकीय संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. या जागा केवळ तात्पुर्त्या स्वरुप आहेत. त्याचा कालावधी तीन महिन्याचा असेल. थेट मुलाखीद्वारे या जागा भरण्यात येतील. इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहे.  

पदाचे नाव आणि तपशील
  

अनु. क्र    पदांचे नाव     पदे

१.    प्रयोगशाळा तंत्रक्ष    ५१                           
२.     क्ष- किरण तंत्रक्ष    ५२
३.     ई.सी.जी.  तंत्रक्ष     ३९
४        औषध निर्माता     ६१     

शैक्षणिक पात्रता: 

प्रत्येक पदाची वेगवेळी शैक्षणिक पात्रता आहे. मात्र सर्व पदांना 30 हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मुळ जाहीरात पाहा.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :  

सोमवार 13 जुलै ते २४ जुलै पर्यंत अर्ज सादर करु शकता. सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० पर्यंत प्रत्यक्ष अर्ज सादर करावे लागतील.

अर्ज सादर करण्याचे स्थळ:

प्रवैअ व खाप्र (माओसे) यांचे कार्यालय, ७ वा मजला, के. बी. भाभा मनपा सर्वसाधारन रुग्णालय, डॉ. आर, के, पाटनकर मार्ग, बांद्रा (प) मुंबई- ४०००५० 

अर्ज कसा करावा 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जाचा नमुना अपलब्ध आहे. त्यानुसार माहिती लिहून किंवा टाईप करुन प्रत्यक्ष सादर करावी. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, पासपोर्ट साईज फोटो चिटकावून प्रत्यक्ष अर्ज दाखल करावा.

अधिक माहितीसाठी : portal.mcgm,gov.in

जाहिरात पाहण्यासाठी: https://drive.google.com/file/d/1-CmCRkEepf5tyDQaOhSwLbOgkFgqjEQ6/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News