मुंबई उच्च न्यायालयात १११ जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020

उमेदवारांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन करुन पुढील नियुक्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

मुंबई : उच्च न्यायलयाने विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली. १४ व्या वित्त आयोगानुसार राज्यातील तालुका आणि जिल्हा सत्र न्यायालयात विविध पदे भरण्यात येणार आहे. ही पदे केवळ १२ महिने कालावधीसाठी असणार आहेत. उमेदवारांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन करुन पुढील नियुक्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाचे नाव, तपशील, पात्रता, वेतन आणि अर्ज करण्याची प्रक्रीया पुढील प्रमाणे.

पदाचे नाव आणि तपशील :

अनु. क्र                 पादांचे नाव                      पदे  

1.            सिनियर सिस्टम ऑफिसर        ३१

2.                 सिस्टम ऑफिसर           ८०

पात्रता व वेतन :

सिनियर सिस्टम ऑफिसर- ३१

 • बी. ई/ बी. टेक कम्प्युटर सायन्स
 • आय. टी/  ईलक्ट्रानिक इंजिनिअरिंग
 • मान्यप्राप्त शिक्षण संस्थेमधून ४ वर्ष अभ्यासक्रम पुर्ण असावा
 • मोस्ट प्रोससर नेटवर्कींग प्रमाणपत्र 
 • वेतन- ४६ हजार

सिस्टम ऑफिसर- ८०

 • बी. ई/ बी. टेक कम्प्युटर सायन्स
 • आय. टी/  ईलक्ट्रानिक इंजिनिअरिंग
 • मान्यप्राप्त शिक्षण संस्थेमधून ४ वर्षाचा अभ्यासक्रम पुर्ण असावा
 • मोस्ट प्रोससर नेटवर्कींग प्रमाणपत्र 
 • वेतन- ४० हजार

अर्ज करण्याची अंतिम तारीख:  

 • ८ ऑक्टोबर २०२०

निवड प्रक्रीया: 

 • उमेदवाराचे शिक्षण, अनुभव आणि मुलाखती यांचे एकत्रीत मुल्यमापण करुन अंतिम निवड केली जाईल

वयोमर्यादा:

 • जाहीरात प्रसिद्ध झालेल्या दिवशी उमेदवारांचे वय ४० वर्षापेक्षा कमी असावे.
 • अनुसुचित जाती- जमाती उमेदवारांचे वय ४५ वर्षापेक्षा अधिक नसावे.

अर्ज कसा करावा

उमेदवारांनी बॉम्बे हायकोर्ट  https://bhc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावा. दिलेली माहिती व्यवस्थीत भरुन पदवी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, फोटो आणि सही स्कॉन करुन अपलोड करावी, त्यानंतर अर्ज सबमीट करावा.  

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News