THDC इंडिया लिमिटेड कंपनीत ११० पदांसाठी भरती; तरुणांना मिळणार संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 September 2020

अप्रेंडशिप काळात विद्यार्थ्यांना उदर्निवाहासाठी मानधन, इतर सेवा- सुविधा दिल्या जाणार आहेत.

मुंबई : THDC इंडिया लिमिटेड कंपनीत विविध ट्रेंडच्या ११० अप्रेंडशिप पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अप्रेंडशिप काळात विद्यार्थ्यांना उदर्निवाहासाठी मानधन, इतर सेवा- सुविधा दिल्या जाणार आहेत. यशस्वीरित्या प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र आणि नोकरीची संधी मिळणार आहे. नामवंत शासकीय आणि खासजी कंपनीत फक्त शिक्षणावर नोकरी मिळत नाही, तर शिक्षणाबरोबर काही कौशल्य, अनुभव आवश्यक असतात. त्यामुळे अप्रेंडशिप कालावधी यशस्वी रित्या पुर्ण करणे आवश्यक आहे. 

पदाचे नाव आणि तपशील :

अनु.क्र                 पादांचे नाव                      पदे

1.     कम्प्युटर ऑपरेटर/ प्रोग्रामिंग असिस्टंट    30
2.        स्टेनोग्राफर सेक्रेटरी/ असिस्टंट            30
3.               ड्राफ्ट्समन (सिव्हील)                 15
4.                        फिटर                             10    
5.                    इलेक्ट्रीशियन                       20         
6.                 इलेक्ट्रॉनिक मशिन                   05

पात्रता 

 • दहावी पास आणि आयटीआय ट्रेड उत्तीर्ण, वर्ष 2016, 2017, 2018,  2019,  2020 

वयोमर्यादा : 

 • सर्वसाधारण उमेदवारांचे वय 18 ते 30 दरम्यान असावे 
 • अनुसूचित जाती- जमाती विद्यार्थ्यांना 3 वर्ष सूट देण्यात आली 
 • दिव्यांग विद्यार्थ्यांना 10 वर्ष शिथिल

प्रशिक्षण कालावधी :  एक वर्ष 

अर्ज कसा करावा?

विद्यार्थ्यांनी https://apprenticeshipindia.org/ या संकेत स्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी, नोंदणीची प्रिंट काढून घ्यावी. त्यानंतर उमेदवारांनी https://www.thdc.co.in/ या संकेतस्थळावर जावून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा. अर्ज हस्तलिखीत किंवा टंकलिखीत भरुन खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. 

पत्ता 
आप्लीकेशन फॉर ट्रेड अप्रेंटिस 2020, 
सीनियर पर्सनल ऑफिसर,
टीएचडीसी इंडिया लिमिटेड,
भागीरथी भवन,
प्रगतीपुराम बायपास रोड,
ऋषिकेश - 249201 

अर्जासोबत 'हे' प्रमाणपत्र लागणार

 • दहावीची गुणपत्रिका 
 • आयटीआय प्रमाणपत्र 
 • दहावीची सनद (जन्म तारखेसाठी) 
 • जात प्रमाणपत्र 
 • दिव्यांग असेल तर त्यांचे प्रमाणपत्र 
 • कॅरेक्टर सर्टिफिकेट 
 • फिटनेस सर्टिफिकेट 
 • आधार कार्ड 
 • रजिस्ट्रेशन प्रिंट आउट 
 •  
  अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 ऑक्टोंबर 2020 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News