मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात ११० जागांसाठी भरती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

विविध पदाच्या एकूण ११० जागांसाठी भरती निघाली आहे. दहावी पासून ते इंजिनिअरिग पर्यंतच्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. १५ हजार ते  १ लाख २३ हजारापर्यंत वेतन दिले जाणार आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

मुंबई: स्वप्नांच्या नगरीला घडवणारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संस्था झपाट्याने शहराचा विकास करत आहे. मुंबईकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोबणारी मेट्रो आपला विस्तार वाढवत आहे. मेट्रोसाठी काम करण्याची संधी महा मुंबई मेट्रो महामंडळाने उपलब्ध करुन दिली. विविध पदाच्या एकूण ११० जागांसाठी भरती निघाली आहे. दहावी पासून ते इंजिनिअरिग पर्यंतच्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. १५ हजार ते  १ लाख २३ हजारापर्यंत वेतन दिले जाणार आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

पदाचे नाव आणि तपशील:  

अनु. क्र    पदांचे नाव        जागा
१    टेक्नीशियन         ५३
२    टेक्नीशियन (सिव्हिल)     ८
३    टेक्नीशियन (सिव्हिल)     २
४    टेक्नीशियन (एसअँडटी)    ३९
५    टेक्नीशियन (एसअँडटी)     २
६    टेक्नीशियन (ईअँडएम)     १
७    टेक्नीशियन (एसअँडटी)     १
८    ट्रेन ऑपरेटर (शंटिंग)    १
९    जूनियर इंजीनियर (स्टोअर)     १
१०     ट्रॅफिक कंट्रोलर -     १
११    हेल्पर         १
   एकूण जागा         ११०

शैक्षणिक पात्रता: 

प्रत्येक पदासांठी वेगवेगळी पात्रता आहे. त्यासाठी मुळ जाहीरात पहावी. त्याच बरोबर सामजिक आरक्षण देण्यात आले आहे. 

अर्ज कसा करावा: 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या mmrda.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तार जाहीरात वाचावी. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ आहे. त्यापुर्वी उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर ओपनसाठी ३०० आणि इतर मागासवर्गीयांसाठी १५० रुपये फी आकारण्यात आली. 

संपु्र्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा-

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News