विविध पदांसाठी १० हजार जागांची भरती; वाचा सविस्तर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020

एसएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एसएससी सीजीएल भरती प्रक्रियेमार्फत देशातील विविध सरकारी विभागांमधील 10,132 वेगवेगळ्या पदांवर भरती केली जाईल.

नवी दिल्ली : कर्मचारी निवड आयोगाने एसएससी सीजीएल म्हणजेच एकत्रित पदवीधर स्तरावरील भरतीसाठी हजारो पदे काढली आहेत. दहा हजाराहून अधिक पदांद्वारे विविध रिक्त पदे भरण्यासाठी आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. याबाबत तुम्ही एसएससीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा येथे दिलेल्या लिंकद्वारे सूचना तपासू शकता.

एसएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एसएससी सीजीएल भरती प्रक्रियेमार्फत देशातील विविध सरकारी विभागांमधील 10,132 वेगवेगळ्या पदांवर भरती केली जाईल. यामध्ये सामान्य वर्गासाठी 4135  जागा आहेत. तर एससी वर्गासाठी 1353 पदे, एसटीसाठी ७२५ आणि ओबीसीसाठी 2420 पदे काढण्यात आली आहेत.

आरक्षणासाठी हे आहेत नियम
एसएससीप्रमाणेच, जे उमेदवार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत  अशा 855 पदे काढण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त उर्वरित पदे अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत. 

याशिवाय, कर्मचारी निवड आयोग (एसएससी) ची संयुक्त पदवीधर 2019 ची भरती प्रक्रिया (सीजीएल 2019 भरती प्रक्रिया) चालू आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात केवळ 22 ऑक्टोबर 2019 रोजी काढली गेली. त्यावेळी एसएससीतर्फे एकूण पदांची माहिती देण्यात आली नव्हती. आतापर्यंत त्याच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षादेखील घेण्यात आली आहे. मात्र आता या पदांची संख्या आणखी वाढू शकते.

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा : https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/CGLE_2019_tentative_vacancy_02.03.2020.pdf

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News