राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची विक्रमी नोंद 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

मृतांचा आकडा 13,132 वर पोहोचला आहे.

मुंबई: शुक्रवारी राज्यात 9,615 नवीन रुग्णांची विक्रमी नोंद झाली असून, कोरोनाबाधितांची संख्या 3,57,117 वर पोहोचली आहे. आज 278 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृतांचा आकडा 13,132 वर पोहोचला आहे. सद्यस्थितीत राज्यात 1,43,714 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी 5,714 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, राज्यातील आतापर्यंत 1,99,967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.99 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात एकूण 278 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी मुंबईत 54, ठाणे जिल्ह्यात 76, पुणे मंडळात 86, नाशिक 26, औरंगाबाद मंडळ 12, कोल्हापूर 9, लातूर मंडळ 11, अकोला मंडळ 2, नागपूर 1, इतर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 3.68 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 17,87,306 नमुन्यांपैकी 3,57,117 (19.98 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,88,976 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत; तर 45,838 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News