‘केसरी’च्या माध्यमातून दिसणार २१ सैनिकांच्या शौर्याची गाथा

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Wednesday, 20 March 2019

३६  व्या शीख रेजिमेंटचे २१सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर अक्षयकुमारचा ‘केसरी’ चित्रपट आधारित आहे. इतिहासामधील या महत्त्वपूर्ण घटनेची कल्पना; तसेच हा इतिहास आजच्या पिढीला माहीत नसल्याची खंत अक्षयने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. ‘केसरी’च्या माध्यमातून २१ सैनिकांच्या शौर्याची गाथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी म्हणूनच त्याने हा चित्रपट करायला होकार दिला.

‘केसरी’नंतर सारागढीच्या युद्धाची इतिहासाच्या पुस्तकात नोंद व्हावी, अशी इच्छा अक्षयने बोलून दाखवली आहे. अक्षय म्हणतो, ‘ब्रिटनमध्ये ‘सारागढी’ दिवस साजरा केला जातो आणि आपल्या तरुण पिढीला या युद्धाची पुसटशी कल्पनाही नाही. इतिहासाच्या पुस्तकात ‘सारागढी’चा उल्लेखदेखील केला गेला नाही. ‘केसरी’नंतर तरी याची इतिहासामध्ये नोंद व्हावी.’ खरंच, खऱ्या अर्थाने अक्षयच्या या चित्रपटामुळे सारागढीचा इतिहास तरुण पिढीच्या समोर येईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News