'या' प्रशिक्षकांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 June 2020

2018 मध्ये भारतास राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धते सांघिक सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. ते जागतिक दुहेरी क्रमवारीत अव्वल दहामध्ये आहेत.

मुंबई : भारतीय बॅडमिंटन महासंघ मुंबईचे प्रदीप गंधे तसेच मंजूषा कन्वर यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस केली. त्याचबरोबर मुंबईतील अव्वल दुहेरीचा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

नवी दिल्ली आशियाई क्रीडामध्ये गंधे यांनी सांघिक आणि पुरुष दुहेरीत ब्रॉंझ पदक जिंकले होते; तसेच 1979 थॉमस कप जागतिक स्पर्धेत चौथ्या आलेल्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. त्यांनी महाराष्ट्र बॅडमिंटनच्या प्रगतीतही प्रशासक म्हणून मोलाची कामगिरी बजावली होती. मूळच्या महाराष्ट्राच्या असलेल्या, पण आता दिल्लीत स्थायिक झालेल्या मंजूषा कन्वर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांघिक ब्रॉंझ जिंकले आहे. त्यांनी निवृत्तीनंतर अनेक नवोदित खेळाडूंची कारकीर्द घडवली.

मुंबईचा चिराग आणि सात्त्विक साईराज यांनी गेल्या काही महिन्यांत दुहेरीत सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. गतवर्षी त्यांनी थायलंड ओपन स्पर्धा जिंकली आहे; तसेच 2018 मध्ये भारतास राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धते सांघिक सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. ते जागतिक दुहेरी क्रमवारीत अव्वल दहामध्ये आहेत.

चिराग आणि सात्विकसह समीर वर्मा याचीही शिफारस करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आहे. त्याने जागतिक क्रमवारीत अकराव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली होती. त्याने जागतिक टूर मालिकेच्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. दरम्यान, एस. मुरलीधरन आणि भास्कर बाबू यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. मुरलीधरन यांनी विमल कुमार, रूपेश कुमार आणि सानवे थॉमस यांसारखे खेळाडू घडवले आहेत. बाबू यांनी चेतन आनंद, साईना नेहवाल, पारुपली कश्‍यप यांना मार्गदर्शन केले आहे. ते सध्या सिकंदराबाद येथे नवोदित बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करीत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News