मुंबई विभागतील आठ कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता रद्द 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 July 2020

या अटीची पुर्तता करण्यास महाविद्यालयांना शक्य झाले नसल्याने  आठ कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मुंबई - खासगी शिकवण्यांना जोडण्यात येणारी महाविद्यालये विविध कारणांनी अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहेत. अशा वादग्रस्त आठ कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता शिक्षण विभागाने रद्द केल्याचे वृत्त आहे. तसेच सध्या त्या विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दुस-या महाविद्यालयात समाविष्ठ केले जाणार आहे. 

राव एज्युकेशन ट्रस्टची अंधेरी, खारघर, सायन, पेस एज्युकेशन ट्रस्टचे खारघरचे महाविद्यालय, लक्ष्य हायस्कूल, बोरिवली आणि ठाणे इत्यादी महाविद्यालयचे शिक्षण विभागाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या विद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांला जवळच्या महाविद्यालयात समाविष्ठ करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 

ही महाविद्यालये स्वयंअर्थसाहाय्यित शिक्षणसंस्था म्हणून शिकवण्यांनी सुरू केली होती. पण यासाठी शिक्षकांचे प्रमाण आणि पायाभूत सुविधा या अटी पुर्ण करण्याच्या महाविद्यालयांना शिक्षण विभागाने दिली होती. या अटीची पुर्तता करण्यास महाविद्यालयांना शक्य झाले नसल्याने  आठ कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News