पुस्तके मला वाचतात...

पद्माकर भावे
Friday, 17 May 2019

नीट पाहतात, न्याहाळतात 
खूप जपतात पुस्तके मला... 
पसरून पडलेलं मोरपीस,
पिवळसर आपट्याचं पान

अलीकडे एकलेपणी 
वाचतात पुस्तके मला,
माझ्या 'खोलीत' येऊन
विचारतात पुस्तके मला

ओघळतो एक थेंब टपकन
तेव्हा काहीसे आवरतात 
सावरतात पुस्तके मला.....
मी फिरवतो कापणारी बोटे

त्यांच्या जीर्ण पानावरुन तेव्हा.. 
खूप काही स्फुंदत स्फुंदत 
काही सांगतात पुस्तके मला,
तेच झटकतात धूळ माझ्यावरची

नीट पाहतात, न्याहाळतात 
खूप जपतात पुस्तके मला... 
पसरून पडलेलं मोरपीस,
पिवळसर आपट्याचं पान

असं बरंच काही देतात पुस्तके मला
गवसते एक पानखूण...
काही खुणा... काही अधोरेखित असे
माझा चेहरा आरश्याशिवाय

दाखवतात पुस्तके मला
अलीकडे वाचतात पुस्तके मला!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News