'या' कारणामुळे सर्व महाविद्यालयांची सलग्नंता रद्द करणार: मानव संसाधव विकास मंत्री रमेश पोखरियाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020

देशात सध्या ४५ हजार पदवी महाविद्यालये कार्यरत आहेत. यापैकी ८ हजार महाविद्यालयांना स्वायंत्तता देण्यात आली

मुंबई : 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरनानुसार महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासाठी टप्पप्याटप्याने विद्यापीठांची संलग्नला काढून घेण्यात येणार आहे. संलग्नता ऐवजी महाविद्यालयांना आता श्रेणी पद्धतीने स्वायंत्तता देण्यात येईल. ही स्वायंत्तता देण्याची यंत्रना विकसीत केली जाणार आहे. त्यानुसार ग्रेडेड अॅक्रिडिटेशन येण्यात येईल. देशात सध्या ४५ हजार पदवी महाविद्यालये कार्यरत आहेत. यापैकी ८ हजार महाविद्यालयांना स्वायंत्तता देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय मानव संसाधव विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. गुरुवारी (ता. १३) दृकश्राव्य माध्यमाद्वारे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'कोरोना नंतरच शिक्षण' विषयावर पोखरीयाल यांनी आपले मत व्यक्त केले.

काही दिसांपुर्वी मंत्री पोखरीयाल यांनी एका विद्यापीठाला भेट दिली आणि कुलगुरुंशी चर्चा केली. बोलतांना महाविद्यालयांचा विषय निघाला. 'आपल्या विद्यापीठाला किती पदवी महाविद्यालये सलग्नीत आहे?' असा प्रश्न पोखरीयाल यांनी कुलगुरुंना विचाराला. कुलगुरु म्हणाले, 'एकुण ८०० पदवी महाविद्यालये सलग्नीत आहे' पोरखरीयाल यांना कुलगुरुंचे उत्तर ऐकुन आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी पु्न्हा कुलगुरुंना हाच प्रश्न विचारला. तेव्हा कुलगुरुने निसंशय सांगितले ८०० महाविद्यालये. एक कुलगुरु ८०० विद्यालयांच्या कारभार कसा पाहू शकतो? एका कुलगुरुंना ८०० महाविद्यालयाच्या प्राचार्याचे नव तरी लक्षात ठेवणे शक्य आहे का? असा प्रश्न रोखरीयाल यांनी उपस्थित केला. 

'नवीन शैक्षणिक धोरनानुसार एका विद्यापीठाला भविष्यात ३०० पेक्षा अधिक महाविद्यालयांना मान्यता देण्याचे अधिकार असणार नाहीत. त्यासाठी नवीन विद्यापीठ स्थापना करण्याची आवश्यकता भासली तर ती पुर्ण करण्यात येईल. विद्यापीठांना कमी महाविद्यालये सलग्नीत असल्यामुळे महाविद्यालयाच्या कारभारावर देखरेख ठेवणे सोपे जाणार आहे. कामात पारदर्शकता आणि सुसुत्रता राहील', असे पोखरीयाल यांनी सांगितले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News