या कारणामुळे प्राचीन भारतात सेक्सविषयी विषयी खुल्यामनाने चर्चा केली जात होती ?
भारतात सेक्स हा असा विषय आहे की, त्यावर जाहीरपणे चर्चा होत नाही. त्याचबरोबर चर्चा करायचं म्हटलं की नागरिक टाळाटाळ करतात. भारतात समजा एखादी स्त्री सेक्स विषयावर खुल्यापणाने बोलली की, इतर लोकं त्या महिलेला वाईट नजरेने पाहतात, हे आजचं वास्तव आहे. पण भारतीय समाजात आजही महिलांना सेक्सविषयी चर्चा करायला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला सेक्स विषयावर खुल्या मनाने आजही चर्चा करीत नाहीत. प्राचीन भारतात सेक्स हा विषय खूपचं खुल्या विचाराचा होता असं म्हटलं जातं होतं. याचं उदाहरण तुम्ही खजुराहोच्या मंदिरापासून वात्सायन यांच्या प्रसिद्ध कामसूत्र पर्यंत अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. पण पुढे जशी समाजाची वाटचाल होत गेली. तसा समाज सेक्सविषयी चर्चा कमी करू लागला.
त्यानंतर महिला आणि पुरूष यांच्या सेक्सविषयीच्या गोष्टी बंदिस्त घरात होऊ लागल्या. त्याचबरोबर पडद्याआड किंवा हळू आवाजात होऊ लागल्या. परंतु सध्या सेक्सबाबत जनजागृती झाल्याचे आपणास पाहावयास मिळत आहे. खरंतर क्रांतीकारी निर्णय आहे असं म्हणायला हरकत नाही.
नैसर्गिक सेक्सचा साधासुदा अर्थ म्हणजे मुलाला जन्माला घालणं आणि आपलं कुटुंब वाढवणं. पण विज्ञानाच्या मदतीने मुल जन्माला घालता येऊ लागलं. आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब प्रणालीद्वारे हे सर्व शक्य आहे.
सेक्सच्या बाबतीत अनेक देश एका वेगळ्या पातळीवर विचार करत आहेत, आणि भारत एका वेगळ्या पातळीवर चर्चा होते असं वाटणं साहजिक आहे. कारण अनेकदा भारतात जाहीरपणे चर्चा करण टाळलं जातं. जगात पहिली टेस्ट ट्यूब मुलगी जन्माला आली १९७८ मध्ये त्यानंतर साधारण ८० लाख मुलं अशा पध्दतीनं जन्माला आ्ली. त्याचबरोबर हे प्रमाण वाढलं जाईल. आणि जोडपी मुलं जन्माला घालण्यासाठी नव्हे तर शारिरीक संबंधासाठी सेक्स करतील असं हेन्नी टी ग्रीली यांचं मत आहे.
सेक्स शिवाय मुल जन्माला येणार असतील, तर मग सेक्सची आवश्यकता काय ? सेक्स हे महिला आणि पुरूषांची गरज पुर्ण करण्यासाठी असतं. त्याचबरोबर शारिरीक संबंधामुळे त्यांचं अधिक घट्ट होतं. परंतु याच धर्माचा मोठा अडथळा असतो.
प्रत्येक धर्मात शारिरीक संबंधाविषयी नियमावली तयार करण्यात आली आहे, त्यामुळे अनेकजण भारतात नियमावली पाळताना दिसतात. ख्रिश्चन धर्मात मुलं जन्माला घालण्यासाठी पुरूषाने आणि स्त्री ने सेक्स करावा असं सांगण्यात आलं आहे.
शारीरिक सुखाच्या आनंदासाठी सेक्स केला तर भारतात अनैतिक मानलं जातं. पण जुन्या पध्दतीनुसार उत्साहाने सेक्स करण्याला चांगलं म्हटलं गेलेले आहे. शारिरीक संबंध हा फक्त पती आणि पत्नी यांच्यातचं असायला हवा असं काही नाही, तर प्रेम करणा-या दोघांच्या नात्यांमध्ये सुध्दा सेक्स असू शकतो. ती त्याच्या दोघांतील वैयक्तिक बाब आहे.