या कारणामुळे UGC-NET परीक्षा लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020

या कारणामुळे UGC-NET परीक्षा लांबणीवर

या कारणामुळे UGC-NET परीक्षा लांबणीवर

कोरोनामुळे अनेक परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या, तसेच कोरोनाची परिस्थिती पाहून परीक्षा घेतल्या घेतल्या जातील असं राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं. परंतु परीक्षांना अधिक विलंब होत असल्याने राज्य सरकारकडून सर्व उपाय योजना आखून परीक्षा घेण्यास सुरूवात केली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च (ICAR) परीक्षा आणि यूजीसी नीट परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाचवेळी होणार असल्याने  यूजीसीची नॅशनल एलिजिबीलिटी टेस्ट लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  UGC-NET ची परीक्षा १६ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणार होती. परंतु ही परीक्षा आता २४ सप्टेंबर नंतर होईल.

'नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ICAR परीक्षांचे आयोजन १६,१७,२२ आणि २३ सप्टेंबर या तारखांना करण्यात आले होते. पण एकाचवेळी दोन्ही परीक्षा होत असल्याने  UGC-NET ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा २४ सप्टेंबरला होईल. अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वरिष्ठ संचालक साधना पराशर यांनी दिली.

काही विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार असल्याने एक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला, यूजीसी नेटचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल असंही पराशर यांनी सांगितलं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News