...याकारणामुळे सुरेश रैनाने घेतली आयपीएलमधून माघार; संघ व्यवस्थापन नाराज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 1 September 2020
  • चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या इतिहासातील सर्वात आवडता संघ, पण त्याचे भविष्य काय असेल हे कोणालाही माहिती नाही.
  • चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून खासगी कारण देत माघार घेतली.

दुबई :- चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या इतिहासातील सर्वात आवडता संघ, पण त्याचे भविष्य काय असेल हे कोणालाही माहिती नाही. चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलच्या तेराव्या हंगामातून खासगी कारण देत माघार घेतली. चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी २९ ऑगस्ट रोजी रैना माघार घेत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर मायदेशी परतलेल्या रैनाच्या निर्णयावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. याचदरम्यान पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रैना हॉटेलमध्ये मनासारखी रुम मिळाली नसल्याने नाराज झाला होता. रैनाच्या माघार घेण्याच्या निर्णयावर संघचे मालक एन. श्रीनिवासन यांनीही आश्चर्यवजा नाराजी व्यक्त केली.

जुन्या कलाकारांसारखेच क्रिकेटपटू हे देखील असतात. एका परिवारासारखे चेन्नईच्या संघातील सर्व खेळाडू राहतात. पण जर तुम्ही खुश नसाल तर तुम्ही परत जाऊ शकता. कोणावरही मी कधीही जबरदस्ती करत नाही, कधीकधी तुमच्या डोक्यात यशाची हवा जाते, असे म्हणत श्रीनिवासन यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हॉटेलमधील रुमला गॅलरी नव्हती. संघाच्या नियमांनुसार कर्णधार, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांना हॉटेलमध्ये प्रशस्त रुम (Suite) दिल्या जातात. दुबईत अशाच पद्धतीची प्रशस्त खोली रैनालाही मिळाली होती, पण फक्त त्याच्या रुमला गॅलरी नसल्यामुळे तो नाराज होता.

सध्याच्या हंगामासाठी संघाची दारे रैनासाठी खुली ठेवली असली तरीही यंदाच्या हंगामासाठी रैना परतणार नसल्याचे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे. तर काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रैनाचे चेन्नईच्या संघातील दिवस आता संपले असून रैनाला कदाचित २०२१ साठी पुन्हा एकदा लिलावात उतरावे लागेल. रैनाच्या वागण्यावर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी खुश नसल्यामुळे आगामी हंगामासाठी रैनाला लिलावात उतरावे लागेल आणि कदाचित दुसरा एखादा संघ त्याला निवडू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिल्यामुळे आगामी काळच काय होणारल ते स्पष्ट करेल.

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News