या कारणामुळे सुप्रिया सुळेंनी केलं आयुक्ताचं कौतुक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 April 2020

शिवाय १४ खासगी संस्थांच्या माध्यमातून ७२ खाटांची सोय क्वारंटाईन वार्डासाठी करण्यात आली आहे. सील केलेल्या परिसरातील ८ हजाराहून अधिक नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर्स व आरोग्यसेवक अशी २२ जणांची टिम तैनात आहे.

नाशिक महापालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही चांगल्या उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये शहरातील रस्त्यांवर २८७ कामगार व १३ पंपांच्या मदतीने जंतुनाशके फवारण्यात येत आहेत. याशिवाय क्वारंटाईन केलेल्या परिसरातील कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील ७४८ मेडिकल ऑफीसर्स व दीड हजार स्वच्छता कर्मचारी यांना पीपीई किटस् पुरविण्यात आले आहेत. शिवाय १४ खासगी संस्थांच्या माध्यमातून ७२ खाटांची सोय क्वारंटाईन वार्डासाठी करण्यात आली आहे. सील केलेल्या परिसरातील ८ हजाराहून अधिक नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर्स व आरोग्यसेवक अशी २२ जणांची टिम तैनात आहे. मोहिमेत काम करणार्‍या व्यक्तींच्या परस्पर संवादासाठी ‘महाकवच’ अ‍ॅप व नागरिकांना जीवनावश्यक सेवा घरपोच प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून ‘नाशिक बाजार’ या अ‍ॅपचीदेखील निर्मिती करण्यात आली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश पाठविण्यात येत आहेत.महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कार्यरत असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी ‘अभय’ बॉडी सॅनिटायझिंग मशिन कार्यान्वित करण्यात आले. आशा कर्मचारी,परिचारिका यांच्या माध्यमातून घरोघरी कोविड-19 संदर्भात सर्वेक्षण व सामाजिक जनजागृती करून तपासणी तसेच होम क्वारंटाईन केलेल्या सर्व व्यक्तींना सातत्याने फोनद्वारे संपर्क व प्रत्यक्ष भेटीवर भर देण्यात आला आहे..या सर्व उपाययोजनांबद्दल नाशिकचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व त्यांच्या टीमनाशिकमधील मुख्य भाजीपाला बाजारांची विभागणी करून शहरामध्ये वेगवेगळ्या १०६ ठिकाणी भाजीपाला विक्री उपलब्ध करुन दिली आहे.याशिवाय ज्येष्ठ नागरिक व विकलांग नागरिकांसाठी महापालिकेमार्फत विशेष मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहेचे मन:पूर्वक अभिनंदन! - सुप्रिया सुळे 

(ही माहिती सुप्रिया सुळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून घेण्यात आली आहे.) 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News