…या कारणामुळे नववी फेरपरीक्षेतही विद्यार्थी नापास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नववी, अकरावीच्या परीक्षा न झाल्याने मागील सत्रातील मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करण्यात आला.
  • यामध्येही अनेक विद्यार्थी नापास झाल्याने त्यांची फेरपरीक्षा घेण्यात आली.

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नववी, अकरावीच्या परीक्षा न झाल्याने मागील सत्रातील मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करण्यात आला. यामध्येही अनेक विद्यार्थी नापास झाल्याने त्यांची फेरपरीक्षा घेण्यात आली. यातही दादर येथील एका शाळेने नववीच्या फेरपरीक्षेत यूपीएससीसारखे 20 मिनिटांत 40 प्रश्न सोडविण्यास सांगितले. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याविरोधात पालकांनी शिक्षण मंत्र्यांकडेही तक्रार केली आहे.

शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार शाळांनी नववी आणि अकरावीतील नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली. या परीक्षेत अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. दादर पूर्व येथील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेत नववीच्या फेरपरीक्षेतही अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. याप्रकरणी काही पालकांनी शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्तांकडे ही तक्रार केली आहे. नववी, दहावीच्या नापास विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पाठवावे, अशी मागणी पालकांनी शिक्षण विभागाकडे केली होती; मात्र शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन पुढील वर्गात पाठवण्यात यावे, असा निर्णय घेतला होता.

शिक्षक परिषदेकडेही धाव

परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी थोडी हालचाल केल्यासही ती कॉपी समजून संध्याकाळी परत अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली गेली व या विद्यार्थ्यांना पुन्हा नापास करण्यात आले, असा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी पालकांनी शिक्षक परिषदेकडेही शाळेविरोधात तक्रार केली असल्याचे शिक्षक परिषदेचे शिवाय दराडे यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News