'या' कारणामुळे संजय दत्त उपचारासाठी अमेरिकेत जाऊ शकत नाही 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020
  • बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याच्या बातमीनंतर त्याच्या कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याच्या बातमीनंतर त्याच्या कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याच्या उपचारासाठी तो अमेरिकेत जाऊ शकतो असे सांगण्यात येत होते, पण आता अशी गोष्ट समोर आली आहे की संजय दत्तला अमेरिकेत जाणे कठीण होऊ शकते.मिळालेल्या माहितीनुसार  संजयकडे अमेरिकेचा व्हिसा नाही. मात्र, तो व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही सांगितले जात आहे.

संजय दत्त अमेरिकेच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाऊ शकतो, परंतु संजय दत्तला अमेरिकेचा व्हिसा नाही आणि तो मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आहे. 

अशा परिस्थितीत संजय दत्त वैद्यकीय पातळीवर अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु जर त्यांना अमेरिकेत उपचार घेण्याची परवानगी नसेल तर तो दुसरा पर्याय म्हणून उपचारांसाठी सिंगापूरला जाऊ शकतो. परंतु याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी कोणताही खुलासा केला नाही. 

संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाची खबर मिळताच त्यांची पत्नी मान्यता दत्त आपल्या दोन मुलांसमवेत स्पेशल विमानात थेट दुबईहून मुंबईला पोहोचली. मार्चपासून देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे आणि दुबईत ती अडकली होती, पण आता ती मुंबईत परतली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News