चक्क मैदानाच्या उद्घाटनाच्या कारणावरून आमदार नगरसेवक भिडले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

इच्छुकांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यामुळे विकासकामांच्या घोषणा, उद्‌घाटनांची रेलचेल आहे. यामध्ये स्पर्धकांना कोंडीत पकडण्यासाठी नगरसेवकांच्या कामांचे श्रेयही घेण्याचे प्रयत्न होत आहेत.

नाशिक : इच्छुकांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यामुळे विकासकामांच्या घोषणा, उद्‌घाटनांची रेलचेल आहे. यामध्ये स्पर्धकांना कोंडीत पकडण्यासाठी नगरसेवकांच्या कामांचे श्रेयही घेण्याचे प्रयत्न होत आहेत. शिवसेना उपनेते, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या निवासस्थानानजीकच्या जॉगींग ट्रॅक व मैदानाचे उद्‌घाटन नुकतेच शिवसेना नेते व आमदार योगेश गोलप यांच्या हस्ते झाले. मात्र हे काम आपल्या पाठपुराव्याने झाले, माझे श्रेय हिरावून घेतल्याची खंत त्यांच्या स्प्रधक उमेदवार व भाजपच्या नगरेसविका सरोज अहिरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा या नेत्यांत उद्‌घाटनाच्या निमित्ताने राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. 

निमित्त ठरले विहितगाव येथील मैदानाचे उद्‌घाटन. या प्रभागात केशव पोरजे, सुनिता कोठुळे, सत्यभामा गाडेकर या शिवसेनेच्या तर सरोज अहिरे या भाजपच्या नगरसेविका आहेत. या मैदानाच्या कामासठी पाठपुरावा, निधी उफलब्धते साठी विविध विभागांत पत्रव्यवहार आपण केला. त्यामुळे हे काम झाले. मात्र मला विश्‍वासात न घेता, निमंत्रण न देताच शिवसेनेचे आमदार योगेश घोलप, संबंधीत नगरसेवकांनी त्याचे उद्‌घटान केले. काम मी केले मात्र राजकीय श्रेय मिळू नये यासाठी निवडणुकीच्या तोंडावर हा कार्यक्रम परस्पर केल्याचा आरोप त्यांनी केल्याने हे उद्‌घाटन वादाचा विषय बनले आहे. 

लोकसभेनंतर उमेदवारांना इच्छुकांना विधानसभेचे वेध लागले आहे. प्रचाराचा भाग म्हणून आपणच कायम चर्चेत कसे राहू यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या क्‍लुप्त्या सुरु केल्या आहेत. महापालिकेच्या चार नगरसेवकांच्या बहुसदस्यीय प्रभागात एकाच कामावर चौघेही दावेदार असतात. त्यामुळे इच्छूकांना चर्चेसाठी आयतेच भांडवल मिळाले आहे. देवळाली मतदारसंघातील विहीतगाव येथे प्रत्येक कामात शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयांचे राजकारण रंगत आहे. आमदारकीच्या स्पर्धेत असल्याचे दाखविण्याच्या प्रयत्नात प्रत्येक कामात शिवसेना आणि भाजपच्या इच्छूकात श्रेयाचा वाद रंगू लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या  तोंडावर प्रत्येक कामाचे घेऊन प्रसंगी आरोप-प्रत्यारोपातून स्वताला चर्चेत ठेवण्याच्या उमेदवारांच्या राजकिय खेळ्यांमुळे मतदारांची मात्र चांगलीच करमणूक सुरु आहे.  विशेष म्हणजे सोशल मिडियावर कार्यकर्त्याकडून इच्छूकातील लूटुपूटूच्या उथळ चर्चेला हवा दिली जात आहे. 

मतदारसंघातील काम असल्याने मी केवळ उद्घाटनासाठी उपस्थित होतो. हा नगरसेवकांचा आपसातील वाद आहे. त्यांनी परस्परांत मिटविलेला बरा. - आमदार  योगेश घोलप, शिवसेना. 

मैदानातील सुविधा, खेळणी व अन्य कामे यासाठी मी महापालिकेकडे सतत पत्रव्यवहार केला. विविध विभाग व अधिकाऱ्यांना पत्र लिहून, पाठपुरावा करुन त्याला मंजुरी मिळाली. मात्र श्रेय मिळू नये म्हणून माझ्या अनुपस्थितीत परस्पर उद्‌घाटन झाले. - नगरसेविका सरोज अहिरे, भाजप. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News